जामखेड प्रतिनिधी : ५ जानेवारी
आज रोजी होणाऱ्या अपघातांना असलेल्या अनेक कारणांमध्ये खराब रस्ते हेही एक कारण आहे. आता रस्ते चांगले होत आहेत. त्यामुळे गाड्यांचा स्पिड वाढणार मात्र पालकांनी आपल्या मुलांना गाड्या घेऊन देताना त्या योग्य पद्धतीने चालवण्याचे शिक्षणही दिले पाहिजे. तसेच शाळा काॅलेजेस मधूनही वाहतूकीचे नियम शिकवले गेले पाहिजेत. कारण अपघाताचे प्रमाण वाढले असून यामध्ये तरूण मुलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. अपघातत जर एखाद्या घरातील प्रमुखाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबाची खुप बिकट परिस्थिती होती. त्यामुळे रस्ते अपघात रोखणे ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन विभाग व महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने २ जानेवारी ते ८ जानेवारीपर्यंत रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्या अंतर्गतच उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगरच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार व मोटार वाहन निरिक्षक आयशा हुशेन यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हात ३३ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२२ तर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने २ जानेवारी ते ८ जानेवारीपर्यंत अभियान राबविण्यात येत असून त्या निमित्ताने आज दि. ४ जानेवारी रोजी
जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयाच्या सभागृहात उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने सुरक्षा सप्ताह व जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहायक मोटार वाहन निरिक्षक चेतन दासनूर व राहुल सरोदे, जिल्हा प्राथमिक बॅंकेचे संचालक संतोषकुमार राऊत, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, यश मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक संभाजी वटाने, यादव मोटार ड्रायव्हिंग स्कुलचे संचालक जगदीश यादव,
आदी मान्यवरांंसह जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक - शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.
यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक चेतन दासनूर म्हणाले की, अहमदनगर येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्ह्यात ३३ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२२ राबविण्यात येत आहे. त्यानुसार अनेक कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामाध्यमातून रस्ते अपघातात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रस्ते आघातात मृत्यू होणारे कोणाचे तरी वडील, भाऊ, पती. मुलगा असतो. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा अघात होते. जर आपल्याला रस्ते अपघात थांबवायचे असतील तर सर्वच पातळीवर जनजागृती व वाहतूकीचे नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे व सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केंद्रप्रमुख किसन वराट यांनी मानले.
दरम्यान सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक चेतन दासनूर व राहुल सरोदे यांनी जामखेड येथील यश मोटार ड्रायव्हिंग स्कुल व यादव
मोटार ड्रायव्हिंग स्कुल येथे भेट दिली व संचालक संभाजी वटाने व जगदीश यादव यांनीही या अभियानात सहभाग नोंदवावा यासाठी आवाहन व मार्गदर्शन केले.
नियमांचे पालन करा व अपघात टाळा.
मोटारसायकल चालकांसाठी
* मोटार सायकलवर २ पेक्षा जास्त व्यक्तीने प्रवास करु नये. *नेहमी हेल्मेटचा वापर करावा.
* मोबाईलवर बोलू नका. वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास अपघाताची शक्यता चौपटीने वाढते.
*आपले कपडे व इतर वस्तू इतर वाहनांत अडकणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.
*ओव्हरटेक नेहमी उजव्या बाजूनेच करावे. ओव्हरटेक करताना आरसा व दिशादर्शकचा वापर करावा. चौकात, वळणावर, पुढील रस्ता अदृश्य असेल तेव्हा आणि विशेषत: आपण द्विधा मनस्थितीत असाल तेव्हा ओव्हरटेक करू नये.
* ओव्हरटेक करीत असाल तेव्हा समोरून येणाऱ्या व ज्या वाहनास ओव्हरटेक करीत आहात त्या वाहनातील ड्रायव्हरला तुम्ही दिसत असाल अशा ठिकाणीच ओव्हरटेक करा. विशेषत: आपण द्विधा मनस्थितीत असाल तेव्हा ओव्हरटेक करू नये.
*लहान मुलांना गाडीच्या टाकीवर बसवू नका. तसेच मुल मागे बसलेले मुल उलटे बसले नाही याची खात्री करा.
*वाहनाची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगा.
* चढावर, वळणावर किंवा जिथे रस्त्यावर एकेरी किंवा दुहेरी अखंड पट्टा रंगविलेला असेल तेथे ओव्हरटेक करु नका. वाहन धोकादायक पध्दतीने किंवा वेडेवाकडे चालवून पुढे जाण्याचा प्रयत्न करु नका.
* मोटार सायकल भरधाव वेगाने चालवू नका, कमाल वेग मर्यादा ताशी ५० कि.मी. आहे. त्याचे पालन करा.
*लेनची शिस्त पाळा, वळण्यापूर्वी इशारा करा.
*आपल्या वाहनाचा हॉर्न कर्णकर्कश किंवा चित्र-विचित्र आवाजाचा नसल्याची खात्री करा.
* पुढचे वाहन अचानक थांबू शकते, त्यामुळे त्यापासून सुरक्षित अंतर ठेवा.
* झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी आहे, आपले वाहन त्यापूर्वीच थांबवा.
* पाणी, वाळू, ऑईल सांडलेल्या रस्त्यावर वाहन घसरु शकते. अशा वेळी कृपया आपले वाहन सावधानतेने चालवा.
* नियमांचे पालन न केल्यास आपल्या विरुध्द न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो, दंड केला जाऊ शकतो तसेच ड्रायव्हिंग ला वाहन निलंबित केले जाऊ शकते.
कार/ जीप चालकांसाठी आवाहन
* वाहनचालक व वाहनातील सर्व व्यक्तींनीसुद्धा
सीटबेल्टचा वापर करावा.
*लहान मुलांना मागील सीटवरच बसवावे व त्यांच्यासाठी चाईल्ड सीटचा वापर करावा. .
* पुढच्या वाहनाशी सुरक्षित अंतर ठेवावे. वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी, वेग कमी करण्यापूर्वी किंवा थांबविण्यापूर्वी योग्य तो इशारा करा.
* समोरचा रस्ता पूर्ण दिसत असेल आणि समोरुन वाहन येत नसेल तरच योग्य तो अंदाज घेऊन आणि इशारा करून ओव्हरटेक करा.
*दुसरे वाहन तुमच्या वाहनाला ओव्हरटेक करत असेल तर तुम्ही उजव्या बाजूचा इंडिकेटर दाखविणे पूर्णपणे चुकीचे आणि घातक आहे. अशावेळी तुमच्या वाहनाचा वेग कमी करा व डाव्या बाजूचा इंडिकेटर दाखवून वाहन डाव्या बाजूला घ्या.
• लेनची शिस्त पाळा, वळण्यापूर्वी योग्य तो इशारा.
*ओव्हरटेक नेहमी उजव्या बाजूनेच करा.
* डाव्या बाजूच्या दरवाज्यातूनच उतरा.
* रस्त्यावरील आखलेल्या पट्ट्यांचा अर्थ जाणून घ्या व त्याप्रमाणे पालन करा.
* प्रखर किंवा रंगीत दिव्यांचा वापर करु नका. तसेच डिपरचा वापर करा. " वाहनाचा वेग दिवसा व रात्री आपल्याला रस्ता दिसेल एवढा असावा त्यापेक्षा जास्त नसावा.
*मुलांना लहान वयात वाहन चालवू देऊ नका.
*दारु पिऊन वाहन चालवू नका.
* वाहतूक चिन्हे व रस्त्यावरील चिन्हांची माहिती घ्या व त्याचे पालन करा.
* वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करु नका.
*नियमांचे पालन करा व अपघात टाळा. स्वयंशिस्त असेल तर अपघात टाळू शकतो हे लक्षात ठेवा.
* वाहनाची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगा.
No comments:
Post a Comment