साकत प्रतिनधी :४ जानेवारी
४ जानेवारी रोजी दादा घोडेस्वार यांचा वाढदिवस साजरा करताना एक गरीब कुटुंबातील व्यक्तिमत्व असलेले तसेच इंदिरा हॉस्पिटल मध्ये काम करत असलेले हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुहास सूर्यवंशी, डॉ. पल्लवी सूर्यवंशी यांचे विश्वासू आणि हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ. तसेच माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, प्रा. अरुण वराट सर व सामाजिक कार्यकर्ते विकी भाऊ सदाफुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून दादा घोडेस्वार हे गेले तीन ते चार वर्षापासून हॉस्पिटल मध्ये काम करत आहेत. मागील कोविड महामारी मध्ये आपल्या जीवाची परवा न करता रुग्णवाहिके वर सेवा केली. साकत गावामध्ये तसेच विविध ठिकाणी Arsenic album - 30 ( अर्सेनिक ) गोळ्यांचे वाटप केले होते. यावर्षी ही जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साकत येथे सर्व विद्यार्थ्यांना पेन व वहीचे वाटप करण्यात आले आहे.
साकत येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात सिलिंग फॅन देण्यात आला आहे. यावेळी उपस्थित गावचे सरपंच हनुमंत पाटील, उपसरपंच राजू वराट व सदस्य मिलन घोडेस्वार, महादेव वराट, पोलीस पाटील व शाळेतील हेडमास्टर मोरे सर, साखरे सर, खडूस सर, भोसले मॅडम, तसेच सर्व स्टाफ व गावकरी उपस्थित होते व सर्वांनी हे वर्षे आनंदी सुखसमृद्धीचे व निरोगी जावो. वाढदिवसाच्या तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व मित्र मंडळ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment