खर्डा प्रतिनधी:४ जानेवारी
जामखेड तालुक्यातून प्रकाशित होणारे व संपूर्ण राज्यात वितरित होणारे साप्ताहिक पोलीस वारंट या वृत्तपत्राच्या पोलीस स्थापना दिन विशेषांकांचे अनावरण जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले
नवीन वर्षाचे औचित्य साधून व २ जानेवारी पोलीस स्थापना दिन असा संयुक्त विशेषांक पोलीस वारंटने पोलीस स्थापना दिनाच्या दिवशी प्रकाशित केला व पोलीस वारंट वृत्तपत्राद्वारे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या, यामध्ये खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांची मुलाखत संपादिका श्वेता गायकवाड यांनी घेऊन प्रकाशित केली आहे तर कशाप्रकारे जनतेच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस दल सक्षम आहे हे या मुलाखतीद्वारे प्रकाश पाटील यांनी सांगितले आहे, कारण खर्डा हे जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे येथे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस स्टेशनच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. व खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने खर्डा व हद्दीतील सर्व नागरिकांना सुरक्षा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र जनतेनेही आपले व आपल्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी नेहमीच सतर्क असले पाहिजे असे वक्तव्य सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी त्यांच्या मुलाखतीद्वारे खर्डा व परिसरातील सर्वच नागरिकांना सांगितले आहे. यावेळी उपस्थित पोलीस वारंट संपादिका श्वेता गायकवाड, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व पोलीस कॉन्स्टेबल उपस्थितीत होते.
No comments:
Post a Comment