खर्डा प्रतिनधी : ३ डिसेंबर
बंधनाचे फास आम्ही भिरकावूनी देणार. क्रांतीज्योती साविञीचा आदर्श आम्ही घेणार. असा संकल्प करत तेलंगशी येथील जिल्हा प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
जामखेड तालुक्यातील तेलंगशी या शाळेत नेहमीच विविध उपक्रम व महान व्यक्तीमत्वांच्या जयंती पुण्यतिथींचे कार्यक्रम केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर आज दि. ३ जानेवारी रोजी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी
बंधनाचे फास आम्ही भिरकावूनी देणार...
क्रांतीज्योती साविञीचा आदर्श आम्ही घेणार....
आम्ही आता शिकणार ...आम्ही आता शिकणार.. असा अनोखा संकल्प करुन
शाळेच्या च्या साविञींनी व सर्व विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांना अभिवादन केले.3 जानेवारी बालिका दिनाचे औचित्य साधून जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी येथे सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या महिला शिक्षिका श्रीम. लक्ष्मी जायभाय तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी सेविका सारिका ढाळे, मुख्याध्यापक केशव गायकवाड, शिक्षक आनंता गायकवाड,संतोष गोरे,सुशेन चेंटमपल्ले, विजयकुमार रेणुके, अशोक जाधव, प्रसाद भिसे, नितीन पवार आदीसह पालक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ययावेळी शाळेतील लक्ष्मी क्षिरसागर, अमृता चौधरी व भक्ती पाटील यांनी आपल्या मनोगतातून साविञीबाई फुले यांच्या कार्याचा परिचय व्यक्त केला. शाळेचे मुख्याध्यापक केशव गायकवाड यांनी मुलींचे शिक्षण हे देशाच्या प्रगतीचे लक्षण असून प्रत्येक मुलींने उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार केला पाहिजे. असे विचार मांडले. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका व कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीम. लक्ष्मी जायभाय यांनी सर्वच क्षेञातील महिलांची उत्तुंग झेप ही खर्या अर्थाने साविञी माईंच्या कार्याचे फलित असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी शाळेच्या विद्यार्थींनीनी "साविञी फुले वानी व्हावे तुम्ही बलवान" या गीतावरील नृत्यातून साविञीबाई फुले यांना वंदन केले. शाळेच्या सर्व विद्यार्थीनींनी साविञीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेच्या बालसाविञींनी केले. या कार्यक्रमाचे सूञसंचलन कु.ॠतुजा ढाळे व समृद्धी ढाळे यांनी केले. आभार प्रदर्शन कु.वैष्णवी जायभाय हिने मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंता गायकवाड, संतोष गोरे, सुशेन चेंटमपल्ले, विजयकुमार रेणुके, लक्ष्मी जायभाय, अशोक जाधव, प्रसाद भिसे व नितीन पवार या शिक्षकांनी बालसाविञींना प्रेरित केले.
No comments:
Post a Comment