पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ मे
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला.त्याचवेळी दुसरीकडे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मात्र वेगळी भूमीका मांडली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवा अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रांताध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली हा पक्ष चालणार आहे. हा निर्णय कालच होणार होता मात्र काल १ मे असल्यामुळे निर्णय जाहीर केला नाही. आज ना उद्या हा निर्णय होणार होता, असे म्हणत अजित पवारांनी वेगळी भूमिका मांडली आहे.अजित पवार म्हणाले , नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रदेशाध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्या मनाप्रमाणे पक्ष चालणार आहेत. प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि आज अचानक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र त्यांनी स्वतःपासून फिरवली.
No comments:
Post a Comment