पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२८ डिसेंबर२०२४
कर्जत-जामखेडचे -भुमिपुत्र असलेले नामदार प्रा. राम शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध निवडीबद्दल उध्या रविवार दि. २९ डिसेंबर रोजी कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यांतील भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असुन या मिरवणुकीत दोन्ही तालुक्यांतील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन भाजपा व महायुतीती मित्र पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.
कर्जत-जामखेडचे भुमिपुत्र असलेले नामदार. प्रा. राम शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यापासून कर्जत जामखेड मधील भाजपा कार्यकर्ते व प्रा. राम शिंदे यांचे महाराष्ट्रभरातील चहाते व मित्र परिवार यांच्यात मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दि. २९ डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला उत्सवाचे स्वरूप येताना दिसत आहे. त्याचा परिचय आपल्याला कर्जत व जामखेड शहर तसेच तालुक्यातभरात लागलेल्या स्वागत कमानी व डिजिटल फ्लेक्सरून दिसून येईल दरम्यान दि. २९ डिसेंबर रोजी काढण्यात येणारी मिरवणूक ही कर्जत येथे सकाळी १०.३० वाजताचे सुमारास कर्जत शहरातील आक्काबाई मंदिर येथुन सुरु होऊन श्री संत सदगुरू गोदड महाराजांचे दर्शन- मेन रोड मार्गे दुपारी १२:३० वाजताचे सुमारास दादा पाटील कॉलेज जवळ सांगता तर जामखेड तालुक्याच्या वतीने होणारी भव्य मिरवणूक दुपारी २:०० वाजताचे सुमारास जामखेड येथिल नगर रोडवरील शासकीय विश्रामगृह येथून खर्डा चौक बीड रोड कॉर्नर व ४: ०० चे सुमारास तहसिल कार्यालय प परिसरात सांगता होणार आहे. या भव्य मिरवणूकीचे आयोजन भारतीय पार्टी कर्जत- जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे या मिरवणुकीसाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती राहून आपल्या भुमिपुत्राचा गौरव करावा असे आवाहन भाजपा व महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment