पोलीस वारंट न्यूज नेटवर्क २९/१२/२०२४
विधानपरिषदेच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल प्रा राम शिंदे यांचा जन्म गाव चौंडी येथे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले आहे.
विधानपरिषद सभापती झाल्या नंतर दि २९ रोजी सभापती प्रा राम शिंदे यांचे जन्म गावी चौंडी येथे आगमन होताच त्याचे घरा पासून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली घरोघरी सडा रांगोळी काढली होती त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर फुले आंथरण्यात आली होती प्रत्येकाच्या घरासमोर मिरवणूक आल्यावर महिलांनी औक्षण केले जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्दारे स्वागत केले संपूर्ण चौंडी गाव गुलाबी रंगाची उधळण केल्याने गुलाबी झाले होते मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आणि शेवटी चौंडी येथील अहिलेश्वर मंदीरात अभिषेक करण्यात आला
No comments:
Post a Comment