पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२९ डिसेंबर२०२४
जामखेड तालुक्याचे भुमीपुत्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी व बाजार समितीच्या आवारातील व्यापारी यांच्यासाठी अनेक सोईसुविधा निर्माण करून दिल्या जात असून आज रोजी बाजार समितीने उपलब्ध करून दिलेल्या ८० मॅटिक टन वजनकाट्याचा सर्व शेतकरी बांधव व व्यापारी बांधवानी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले.
जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांना सोईसुविधांची उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेसर असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले व संचालक मंडळाने आणखी एक पाऊल उचलेले असून शेतकरी व व्यापारी यांना येणारी वजन काट्याची अडचण लक्षात घेऊन बाजार समितीच्या मुख्य आवारात ८० मॅटिक टन वजनकाटा सुरु करण्यात आला आहे.
काल दि. २८ डिसेंबर रोजी दुपारी ४.०० वाजता उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती कैलास वराट, संचालक सचिन घुमरे, सुधीर राळेभात, डॉ सिताराम ससाने, बबन हुलगुंडे, विठ्ठल चव्हाण, सुरेश पवार, गजानन शिंदे, सचिव वाहेद सय्यद, उपसचिव ढगे साहेब, व्यापारी महेंद्र बोरा, रामहरी गंडाळ फिरोज कुरेशी प्रगतशील शेतकरी महादेव डोके, संजय डोके आदि मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत या ८० मॅटिक टन वजनकाट्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील व्यापारी व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थितीत होते. सन्माननीय सर्व संचालक मंडळाच्या उपस्तिथीत शुभारंभ होणार आहे.
No comments:
Post a Comment