पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १० जून
अहमदनगर शहरातील फकीरवाडा येथील संदल मिरवणुकीत समजाकंटकांनी जाणीवपुर्वक औरंगजेबाची प्रतिमा असलेले फलक झळकावुन व हिंदू विरोधी घोषणा देवुन हिंदू व मुस्लीम समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करून समाजाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदू समाजाच्या सदर कृत्या मुळे धार्मिक भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्यामुळे संबधित समाज कंटकावर कठोरात कठोर कारवाई करावी. त्यांना अटक करून नगर जिल्हामधुन तडीपार करण्यात यावे. यासाठी जामखेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जामखेडचे तहसिलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी भाजपचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रवींद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, ज्ञानेश्वर झेंडे, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन (मामा) गडदे प्रवीण चोरडिया, युवक कार्यकर्ते संतोष गव्हाळे,ऋषिकेश मोरे, अभय राळेभात, पोपट राळेभात, माजी सरपंच संजय गोपाळघरे, मोहन देवकाते, माजी सरपंच लहु शिंदे, मनोज कुलकर्णी, डाॅ. एकनाथ मुंडे, विवेक कुलकर्णी, प्रविण बोलभट, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, विष्णू गंभीरे, उदय पवार, उपसरपंच आप्पासाहेब ढगे, गोरक धनवट, केशव वनवे, गणेश आजबे, प्रविण होळकर, आण्णा ढवळे, मनिष मासाळ, संजय राऊत, तुषार बोथरा आदी पदाधिकाऱ्यांसह भाजपा कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
तसेच जामखेड शहरामध्ये सुध्दा काही मुस्लीम समाजामधील काही तरूणांनी मोबाईलवर औरंगजेबाचे स्टेस्टस ठेवुन तसेच नगर शहरामधील मिरवणुकीचे स्टेटस ठेवुन हिंदू समाज्याच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुध्दा योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत व समाजामध्ये तेड निर्माण होणार नाही यांची दक्षता घ्यावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी रविंद्र सुरवसे, अजय काशिद, शरद कार्ले, डॉ एकनाथ मुंढे, विवेक कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली.
यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी जामखेड तालुका शांत राहण्यासाठी सर्वोतोपरी प्रशासकीय सहकार्य केले जाईल असे अश्वासन भाजपा कार्यकर्त्यांना दिले.
No comments:
Post a Comment