संविधान समता वारकरी दिंडी म्हणजे समतेचा विचार पेरणारी चळवळ -ॲड. डॉ. अरुण जाधव - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, ३० जून, २०२३

Home खर्डा शहर संविधान समता वारकरी दिंडी म्हणजे समतेचा विचार पेरणारी चळवळ -ॲड. डॉ. अरुण जाधव

संविधान समता वारकरी दिंडी म्हणजे समतेचा विचार पेरणारी चळवळ -ॲड. डॉ. अरुण जाधव

शुक्रवार, जून ३०, २०२३ खर्डा शहर,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३० जून

  संविधान समता वारकरी दिंडी म्हणजे समतेचा विचार पेरणारी, माणसे जोडणारी आणि संविधानातील मूल्यांचा प्रचार, प्रसार करून जनजागृती व प्रबोधन करणारी चळवळ आहे. असे प्रतिपादन ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केले . 

ग्रामीण विकास केंद्र, संविधान साथी टीम व माय लेकरू प्रकल्प कर्जत-जामखेडच्या वतीने आयोजित खर्डा ते धनेगाव पायी संविधान समता दिंडीच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या धनेगाव येथील विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात आयोजित या दिंडीच्या सांगता सोहळ्यास कोरो मुंबईचे महिंद्र रोकडे, खर्ड्याचे सह्ययक पोलीस निरीक्षक महेश जानकर , सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ ,कुणाल राम टेके, सचिन खाडे, उषा देशमुख, राजू शिंदे, संदीप कांबळे, हनीफभाई, जिजाबाई खाडे,  सुजाता लवांडे, ग्रामीण विकास केंद्राच्या सचिव उमाताई जाधव, संचालक बापू ओहोळ, प्रकल्प समन्वयक सचिन भिंगारदिवे, प्रसिद्धीप्रमुख भगवान राऊत आदी यावेळी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, साधू संतांची शिकवण, थोर महापुरुषांचे विचार आणि संविधानातील समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये आणि भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत हक्क व अधिकार याबाबत समाजाला सतत जागृत ठेवणे हा या दिंडीचा प्रमुख उद्देश आहे. 

कोरो मुंबईचे महेंद्र रोकडे म्हणाले की, थोर संत तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथेतून व अभंगातून माणुसकीचे विचार दिले. त्याचा अर्थ म्हणजे भारतीय संविधान होय. मात्र अलीकडच्या काळात संतांची वचने आणि संविधानाच्या विरोधात काही मंडळी काम करीत आहेत. अशा प्रवृत्तींना खड्यासारखे बाजूला सारले पाहिजे. विठ्ठल हा सर्व जाती-धर्मातील लोकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र कालच्या पंढरपूरच्या वारीतून भटक्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न काही मंडळींनी जाणीवपूर्वक केला. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला. पांडुरंग हा माणुसकीचा देव आहे आणि त्याचे दर्शन घेण्यापासून भटक्यांना कोणीही रोखू शकत नाही. असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. उमाताई जाधव यांनी आभार मानले. सकाळी १० वा. खर्डा येथील सिताराम गड येथे नारळ वाढवून या दिंडीचे प्रस्थान झाले . खर्डा, वंजारवाडी, सातेफळ, तरडगाव, सोनेगाव व धनेगाव मार्गे ही दिंडी सायंकाळी ४ वा. विठ्ठल मंदिरात पोहोचली.दिंडी मार्गावर दादा पाटील दाताळ, शहाजी सोनवणे, महादेव जाधवर,डॉक्टर राळेभात व समस्त वडार समाज संघटनेच्या वतीने या दिंडीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. या वेळी सुजाता लवांडे मुंबई  तर सातेफळ येथे राजेंद्र भोसले, आजिनाथ लटके,  मोहन भोसले,  सावळा भोसले,  मच्छिंद्र भोसले, अप्पा भोसले, अशोक भोसले व समस्त गावकऱ्यांनी या दिंडीचे स्वागत केले.वंजारवाडी येथे रावसाहेब खोत व समस्त गावकरी मंडळींनी या दिंडीचे स्वागत केले.तर तरडगाव फाटा येथे पंचशील युवा मित्र मंडळाच्या वतीने या दिंडीचे स्वागत करण्यात आले. सोनेगाव येथे लखन मिसाळ आणि संघर्ष ग्रुपच्या वतीने त्याचबरोबर महिला मंडळाच्या वतीने या दिंडीचे स्वागत करण्यात आले.  तर धनेगाव येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने या दिंडीचे स्वागत करण्यात आले. सरपंच सिध्देश्वर शेंडकर, मिठू परकड, बलभीम परकड, अण्णा शिकारे,राहुल दातळ, विकास गोपळघरे, वैजिनाथ पाटील, भीमराव सुरवसे, कैलास जाधवर, बबलू सुरवसे, प्रवीण सदाफुले यांच्यासह खर्डा, सातेफळ, वंजार वाडी, तरडगाव व सोनेगाव येथील महिला व पुरुष सहभागी झाले होते.

दिंडी मार्गावर महिलांनी सडा, रांगोळ्या, फुलांचा वर्षाव, पाय धूनी व औक्षण करून या दिंडीचे स्वागत केले.सोनेगाव येथे संघर्ष ग्रुपच्या वतीने तोफांची सलामी देत लखन मिसाळ मित्र मंडळाने या दिंडीचे स्वागत केले. तर सातेफळ येथे लाला वाळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रास बँड लावून विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या प्रांगणात या दिंडीचे स्वागत केले. शाही थाटातील या दिंडीचे सर्वच ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. 

दिंडीच्या यशस्वीतेसाठी विशाल पवार, सचिन भिंगारदिवे, भगवान राऊत , संतोष चव्हाण, नंदकुमार गाडे,ऋषिकेश गायकवाड, राजू शिंदे, रजनी आवटी, लता सावंत,व्दारका पवार,काजोरी पवार, सुनीता बनकर, रोहिणी राऊत, उज्वला मदने, मामिता पावरा, नरसिंग भोसले, तुकाराम पवार, शीतल काळे, गणपत कराळे ,अतुल ढोणे,प्रवीण सदाफुले, शहानुर काळे,राहुल पवार,यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. 

चौकट
 भारतीय संविधानाची प्रत, प्रास्ताविका, संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्म निरपेक्षता ही मूल्ये अधोरेखित करणारे फलक, सामाजिक प्रबोधनपर, घोषवाक्ये हाती घेतलेले महिला व पुरुष कार्यकर्ते भगव्या पताका हाती घेऊन टाळ मृदंगाच्या निनादात विठू नामाचा गजर करीत सहभागी झालेले समतेच्या वारकऱ्यांनी दिंडी मार्ग फुलून गेला होता.
Tags # खर्डा शहर
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

खर्डा शहर
Posted at शुक्रवार, जून ३०, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels खर्डा शहर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती ? जामखेड तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून मुलांसह आईची आत्महत्याखर्डा पोलीस स्टेशनला ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनधी 9 ऑगस्ट – 2025 नायगाव (ता. जामखेड) येथे पती, सासरे, ननंद आणि नंदाविरुद्ध हुंडा मागणी व मानसिक छळाच्या आरोपावर...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...

Popular Posts

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

दुध दरवाढीच्या शासन निर्णयात सुधारणा करा - आ. प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेत मागणी

जामखेडमधील नऊ वर्षीय मुलीच्या मृत्यूचे विधानपरिषदेत पडसाद ! आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न !

प्रशासनाची कठोर कारवाई: जिवंत व्यक्तीला मृत दाखवणारा ग्रामसेवक सेवेतून निलंबित

जामखेड येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ: औंढा नागनाथमध्ये धक्कादायक घटना;गळफास घेऊन संपवलं आयुष्य

बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला महादेव गीते, व अक्षय आठवले यांनी केली मारहाण

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *