पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२९ जून
खर्डा व पंचक्रोशीतील भाविकांची प्रतिपंढरी असलेल्या क्षेत्र सीताराम गडावर आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांच्या उपस्थित मठाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांच्या हस्ते पुजा करण्यात येऊन उत्सवाला सुरूवात करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे खर्डा येथील श्री क्षेत्र सिताराम गडावर आज दि. २९ जून रोजी आषाढी एकादशी निमित्त छोटी यात्रा पण भरली होती. बारा वाड्या व तेराव्या खर्ड्यातुन भाविक भक्तांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. गडावर फराळ वाटपाचेही आयोजन करण्यात आले होते. गडावर मोठी गर्दी झाल्याने गर्दीचा फायदा घेऊन कोणतीही चोरी किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल धनवडे, महिला पोलीस काॅन्स्टेबल अयोध्या पोकळे, बाळू खाडे, चखाले व आवारे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
आज आषाढी एकादशी निमित्त खर्डा शहरात एकदम भक्तीमय ,व प्रसन्न वातावरणात पहावयास मिळाले. आज चार ते पाच हजार भाविकांनी गडावर हजेरी लावली होती.
No comments:
Post a Comment