पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-६ जून
बावी तालुका जामखेड येथे नुकतेच डाक विभागा मार्फत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचे खाते उघडण्याचे शिबिर नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात लालासाहेब पवार, जगन्नाथ हंबीरराव, गणेश हजारे,धनराज भोसले,विद्या सानप,जुई मराठे यांनी अनेक लोकांचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक चे नवीन खाते उघडून दिले.
यावेळी उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, डाक आवेक्षक बापूराव पंडित, लहू पवार व बावीचे सरपंच आदि उपस्थित होते
डाक विभागातील विविध सेवांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा असे आवाहन यावेळी डाक विभागातर्फे करण्यात आले
No comments:
Post a Comment