पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २ जुलै
विविध विकासकामे, शासकीय कार्यक्रम तसेच गाव पातळीवरील जिल्हा परिषद प्रा.शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैदयकीय दवाखाने, तसेच ग्रामपंचायत कार्यालयांस भेट देणे किंवा विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी आल्यास गटविकास अधिकारी म्हणून माझा सत्कार शाल, श्रीफळ, हार, गुच्छ देऊन न करता व त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणणेसाठी विनाकारण पैसा व वेळ खर्च करता गावातील शालेय विद्यार्थ्यांना, अंगणवाडीतील बालकासाठी शालेय साहित्य (वही, पेन, पुस्तके,), चांगल्या दर्जाचा पोष्टीक खाऊ तसेच आरोग्य विषयक लागणा-या सोई-सुविधा यासाठी करणेत यावा. याबाबी आपल्या विभागांतर्गत केल्यानंतर या बाबतचा चांगल्या प्रकारचा संदेश समाजांमध्ये जाईल असा याबाबतची योग्य ती नोंद घेवुन ग्रामपंचायत स्तरावर याबाबीचे प्रबोधन करणेत यावे असा आदेशच जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी काढला आहे.
जामखेडचे तालुका आरोग्य अधिकारी, खर्डा, अरणगाव व नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती जामखेड पशुधन विकास अधिकारी पशु वैद्यकीय दवाखाना खर्डा, नान्नज, जामखेड, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी, उपकेंद्र ६. तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांना दिलेल्या लेखी आदेशात म्हटले आहे की
तालुक्यातील सर्व विभागप्रमुख व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना सुचित करणेत येते की, गट विकास अधिकारी यांचा हे गाव पातळीवरील भेटीच्या वेळेस सत्कार / स्वागत करतांना शाल, श्रीफळ, हार, गुच्छ या वस्तुने न करता शब्द सुमनाने स्वागत करणेत यावा. तसेच या बाबींसाठी लागणारा पैशाचा विनिपयोग तरी सर्व विभागप्रमुख यांनी आपले अधिनस्त जिल्हा परिषद प्रा. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैदयकीय दवाखाने, यांना याबाबत आपले स्तरावरुन आदेश देणेत यावे. ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक यांनी याबाबतची योग्य ती नोंद घेवुन ग्रामपंचायत स्तरावर याबाबीचे प्रबोधन करणेत यावे.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी जामखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून अनेक नवनवीन उपक्रम राबवत समाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले आहे. यामध्ये स्वच्छता, विहीरी, घरकुल अश्या शासकीय कार्यक्रमांबरोबरच स्वतः पुढाकार घेत कर्मचाऱ्यांसाठी ग्रंथालय सुरू केले आहे. तर आता सत्काराच्या खर्चा ऐवजी शालेय मुलांना मदत करण्याच्या कल्पनेचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. यावरूनच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे वेगळेपण दिसून येते.
No comments:
Post a Comment