पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१० जुलै
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतच्या उपसरपंचदी शीतल सुग्रीव भोसले यांची निवड, भाजपाला १० तर राष्ट्रवादीला ७ मते , राष्ट्रवादीचे २ मते फुटली असल्याचे दिसून आले आहे. काही दिवशी सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी भाजपाच्या सौ. संजीवनी पाटील यांना ९ तर राष्ट्रवादीच्या उमेदवारस ८ मते पडली असून या निवडणूकीत कोणते दोन सदस्य फुटले याची सर्वत्र चर्चा होत आहे. या निवडीने दोन्ही पदे भाजपाकडे गेल्याने ग्रामपंचायतवर पुर्णपणे भाजपाचा ताब्यात गेली आहे.
खर्डा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदासाठी आज दि. १० रोजी दुपारी २:०० ते ३:०० वाजताचे दरम्यान उपसरपंचपदाची गोपनीय पद्धतीने निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपकडून शीतल सुग्रीव भोसले , नवनाथ तुकाराम होडशीळ यांनी तर राष्ट्रवादीकडून वैभव दत्तात्रय जमकावळे यांनी अर्ज भरले होते. मात्र माघारी घेण्याच्या वेळत नवनाथ तुकाराम होडशीळ यांनी अर्ज मागे घेतल्याने सौ. शितल सुग्रीव भोसले व वैभव जमकावळे यांच्या सरळसरळ लढत झाली व वैभव जमकावळे यांचा पराभव करत शितल सुग्रीव भोसले यांनी उपसरपंच पदावर विजय मिळविला. यावेळी भाजपाच्या शितल भोसले यांना १० तर राष्ट्रवादीच्या जमकावळे यांना ७ मते पडली.
या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरपंच संजीवनी पाटील व तलाठी श्रीराम कुलकर्णी, निरीक्षक म्हणून पंचायत समिती विस्तार अधिकारी बी. के. माने व तर सहाय्यक म्हणून ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काम पाहिले .
या अगोदर मागील महिन्यात झालेल्या सरपंचपदाच्या
निवडणुकीत झालेल्या लढतीत मोठ्या चुरशीना भाजपने सरपंच पदावर बाजी मारली व सौ. संजीवनी वैजीनाथ पाटील या झाल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे २ मते फुटून सरपंचपदाच्या निवडणुकीपेक्षा यावेळी एक मत वाढले व भाजपच्याच सौ .शीतल सुग्रीव भोसले या उपसरपंच झाल्या. उपसरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर भाजपच्या वतीने उपसरपंच सौ शितल सुग्रीव भोसले यांचा सत्कार भव्य करण्यात आला यावेळी खर्डा गावच्या सरपंच सौ. संजीवनी वैजीनाथ पाटील, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख रवींद्र सुरवसे, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे, संजय गोपाळघरे, वैजनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, राजू मोरे, महेश दिंडोरे, गणेश शिंदे , नितीन सुवसे ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment