पोलीस वारंट न्यूज नेटवर्क ११ जुलै
आज सकाळी ७.३० च्या दरम्यान जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील राजुरी येथील न्यू इंग्लिश स्कूल राजुरी खर्डा जामखेड रोड या ठिकाणी आपल्या तीन चाकी रिक्षा वाहनावरून खर्ड्याकडे जात असताना जामखेड येथील आरोळी वस्ती येथील रहिवासी सुनील शिंदे या २३ वर्षीय युवकाला अचानक रस्त्याला कुत्रे आडवी आल्याने त्याने अनावर होऊन गाडी साईटला घेतली पण अंतर वळण बाह्य वळण व स्पष्ट उतार असल्याने गाडी रस्त्याच्या कडेच्या एका काटेरी बाभळी च्या झाडाला धडकली सुदैवाने रस्त्याच्या खालील नाल्यामध्ये वाहन नाही गेल्यामुळे जीवित हानी टळली व त्यात तरुणास डोक्याला मोठी जखम झाली व तसेच शरीराला मुका अचानक मार लागला त्यावेळेस आनंदवाडी वरून जामखेडकडे कामासाठी दादासाहेब घुगे व हरिदास घुगे जात होते तसेच जामखेड वरून आनंदवाडी कडे येताना सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे त्याच वेळेस तिथे आले व तरुणांना रिक्षाच्या बाहेर काढून सहकाऱ्यांनी सर्वांनी व्यवस्थित त्याला बाजूला केले व रिक्षा रोडवर होता तो साईटला केला तसेच तरुणाला एका बाजूला घेऊन त्याच्या डोक्याला रुमालाने बांधले व तसेच १०८ मदत मागण्यासाठी कॉल केला पण वेळेअभावी राजुरी मधील क्लिनिक उघडे नव्हते तरुणाच्या परिवारातील लोकही त्या ठिकाणी पोहच झाले व त्यांनी विनंती केली व ठरवले व रुग्णालयात जामखेड येथे खाजगी वाहनाने तरुणाला हलवले,
स्पष्ट उतार चढ थेट वळण असल्याने न्यू इंग्लिश स्कूल राजुरी शाळेसमोरील व खर्डा जामखेड रोड वरील राजुरी जवळ चढावर सतत अपघात होत असतात या ठिकाणी दुर्दैवाने बऱ्याच नागरिकांची जीवित हानी झालेली आहे, रस्त्याला ज्या ठिकाणी अरुंद रस्ता व खोल उंच आहे त्या ठिकाणी संरक्षण कठडे व माहिती दर्शक पाट्या व तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने झेब्रा क्रॉसिंग पट्टे रस्त्याला मारून घ्यावेत अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे यांनी केली
No comments:
Post a Comment