पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २३ जुलै
जामखेड तालुक्यातील राजूरी येथील अवघड वळणावर विटांच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अजय साठे आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले व सदर व्यक्तीला जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणून दाखल केले आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव शिवाजी संपत काळे (वय ६०) रा. पाटोदा (गरडाचे) ता. जामखेड असे आहे. या बाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील राजुरी गावानजीक जामखेड खर्डा रोडवर सांगवी येथून बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विटा ट्राॅलीत भरून एक ट्रॅक्टर खर्ड्याकडे चालला होता. हा ट्रॅक्टर राजूरी जवळील अपघात झालेल्या ठिकाणी उतारामुळे ब्रेक न लागल्याने विटांचा ट्रॅक्टर ट्राॅलीसहीत पल्टी झाला व त्यावर बसलेला या घटनेतील मयत हा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ३:०० वाजताचे सुमारास घडली असुन याबाबत राजूरी येथील ग्रामस्थांनी याची माहिती देताच जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अजय साठे हे आपले सहकारी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पालवे पोलीस कॉन्स्टेबल बागडे यांनी तातडीने घटनास्थळी
जाऊन तेथील वाहतुक सुरळीत करत सदर मयत व्यक्तीला ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर संजय कोठारी यांनी आपल्या रूग्वाहीकेतून सदर मृतदेह जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयआणला असून त्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज शिंदे व किशोर बोराडे यांनी केले.
पुढील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजय साठे हे करत आहेत. याकामी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पालवे, पोलीस पाटील मोरे तसेच देवकाते यांनी मदत केल
No comments:
Post a Comment