पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३ जुलै
जामखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह येथे जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. महेश पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे नियोजन भिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले.
बापूसाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविक करत असताना वस्तीगृहाच्या माध्यमातून शैक्षणिक व निवासाच्या मिळणाऱ्या उत्तम सोयीसुविधा बद्दल समाधान व्यक्त केले व पोलीस प्रशासनाची माहिती वस्तीगृहातील मुलांना मिळावी याकरिता पोलिस निरीक्षक महेश पाटील यांचा वाढदिवस मुलांसोबत साजरा करण्याचा निर्णय भिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने घेतल्याचे सांगितले.
महेश पाटील यांनी बोलताना मुलांना मोलाचा संदेश देत शिक्षण घेत असताना मुलांनी आरोग्य संस्कृती शिक्षण या तीन गोष्टीवर भर देण्यास सांगितले. तसेच आपल्या आई-वडिलांनी शिक्षणासाठी तालुक्याला मोठ्या आशेने पाठवलेले आहे त्यांचे स्वप्न तुमच्या हातात आहे. मला आज तुमच्यासमोर बापूसाहेब गायकवाड यांनी मुद्दाम माझ्या वर्दी वरती घेऊन आले कारण तुम्हाला प्रेरणा मिळेल. ह्या ठिकाणी वस्तीगृहातून शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी व ऊसतोड मजुराचा मुलगा संतोष खाडे पोलीस उपाधीक्षक या पदावर गेले. तीच प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून त्यांना बोलावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह ते संविधान चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत घोड्यावर बसून मिरवणूक काढून जामखेड पंचक्रोशीत व आसपासच्या तालुक्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाचे नाव लौकिक व वस्तीगृहाचे महत्त्व वाढवावे आसपासच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण घेऊन अधिकारी बनावेत असे महेश पाटील यांनी असे मत व्यक्त केले.
यावेळी मनसे तालुकाप्रमुख प्रदीप टापरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक सागर सदाफुले, नायगावचे माजी सरपंच शिवाजी ससाणे, समता ग्रुपचे अध्यक्ष संतोष गव्हाळे, मनसे तालुका उपप्रमुख सनी सदाफुले, युवा काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत अब्दुले यांनी महेश पाटील साहेबांना शुभेच्छा दिल्या.
वस्तीगृहाचे लिपिक मधुकर महानुर सर यांनी वस्तीगृहातील सर्वांना पाहणी करून दाखवली. वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांसाठी सुख सुविधा दाखवून वस्तीगृहाच्या कार्याची माहिती सांगितली. यावेळी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी रक्त लघवी तपासणी मोफत करून देण्याची महेश यादव यांनी घोषणा केली.
यावेळी पोलीस काॅन्स्टेबल अविनाश ढेरे, पालवे मेजर, परदेशी मेजर, पालवे साहेब, राहुल सदाफुले, विशाल लोहकरे, गणेश जमदाडे, सचिन सदाफुले, दत्ता जगताप, विशाल समिंदर, आकाश साठे, अक्षय शिरोळे, संजय साळवे, संतोष थोरात आदी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment