पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ७ जुलै
खर्डा ग्रामपंचायतच्या महिला सरपंच व सदस्या यांच्या कुटूंबातील व्यक्तींचा कारभारातील हस्तक्षेप थांबविण्यात यावा व जे प्रत्यक्ष निवडून आलेले सदस्य आहेत त्यांच्याच मार्फत कामकाज करावे अशी मागणी वडार समाजाचे अध्यक्ष रावसाहेब (बबलू) आण्णा सुरवसे यांनी एका निवेदनाद्वारे खर्डा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांच्याकडे केली आहे.
या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खर्डा ग्रामपंचायत मध्ये सरपंच व सदस्य यांचे नातेवाईक व पती कामामध्ये हस्तक्षेप करत आहेत. त्यांच्यामुळे विनाकारण नागरिकांना अनेक अडचणी निर्माण होत आहे.
तरी खर्डा, ता. जामखेड येथील सदस्य व सरपंच यांची योग्य ती चौकशी करून पतीराज, नियम मोडीत काढावा व नागरिकांची या अडचणींमधुन सुटका करावी अशीही मागणी रावसाहेब (बबलू) आण्णा सुरवसे यांनी केली आहे.
खर्डा येथील वडार समाजाचे अध्यक्ष रावसाहेब (बबलू) आण्णा सुरवसे यांनी जरी ही मागणी केली असली तरी खर्डा ग्रामस्थांचेही हेच मत आहे. या नुसार ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते या मागणीचा विचार करून सरपंचपती व सदस्यांचा ग्रामपंचायत कारभारातील हस्तक्षेप थांबतील का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
No comments:
Post a Comment