पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१३ जुलै
जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हळगाव येथील श्रीराम साखर कारखाना येथून दि. १० जुलै रोजी मोटारसायकल चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद. झाला असून त्याला खरी कैद करण्यासाठी माहिती मिळाल्यास पोलीसांशी संपर्क करावा असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे हवालदार संजय लोखंडे यांनी केले आहे.
जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हळगाव येथील श्रीराम साखर कारखाना येथून दि. १० जुलै रोजी हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH 45 X 6083 ही एका चोरट्याने चोरून नेली असुन सदर चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सदर मोटारसायकल चोरीबद्दल गुन्हा नोंद क्रमांक 308/2023 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जनतेला आव्हान करण्यात येते की, सदर वर्णनाचा इसमाबाबत खात्रीलायक माहिती असल्यास जामखेड पोलीस ठाणे येथे द्यावी.
संपर्क : पोलीस स्टेशन : 02421-221033
पोलीस हवालदार संजय लोखंडे : 9552518656
असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संजय लोखंडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment