पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ३ आॅगस्ट
खर्डा गावचा अन्य व निर्वाचित सरपंच संजीवनी पाटील यांच्या मागणीला मोठे यश आले असून भाजपा नेते रवी दादा सुरवसे यांच्या प्रयत्नातून आ. राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने खर्डा ग्रामपंचायतला दोन नवीन घंटागाड्या मिळाल्या असून दि. २ आॅगस्ट रोजी
ऑगस्ट रोजी दोन नवीन घंटा गाड्यांचा लोकार्पण सोहळा खर्डा येथील माजी सैनिकांच्या वीरपत्नी श्रीमती शारदा तानाजी भोसले, श्रीमती अनिता सदाशिव वाळुंजकर, श्रीमती सीमा रमेश इंगळे यांच्या हस्ते तर खर्डा गावचे माजी उपसरपंच ज्येष्ठ नेते श्रीरंग (दाजी माळी) शेवाळे व सिताराम जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, अशोक खटावकर, सुधाकर काळे, विकास शिंदे, वीरधवल भोसले, ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता कोकाटे, सुदाम होडशिळ, अनिल शिंदे, प्रकाश सोनटक्के, दत्ता गवसणे, अंकुश काळे, शाबाज शेख. इत्यादी सह खर्डा ग्रामस्थ उपस्थित होते.
या अगोदर खर्डा शहरातील कचरा उचलण्यासाठी एकच घंटागाडी होती. त्यामुळे गावातील कचरा उचलण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. याचे गांभीर्य ओळखून सरपंच संजीवनी पाटील यांनी आणखी दोन गाड्यांची मागणी केली होती. यासाठी भाजप नेते रवी दादा सुरवसे यांनीही प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन आमदार राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने दोन इलेक्ट्रिक घंटागाडी खर्डा ग्रामपंचायतला मंजूर करण्यात आल्या. त्यामुळे आता खर्डा गावातील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतकडे एकूण तीन घंटागाड्या उपलब्ध झाल्याने. शहरातील कचरा उचलण्यास मोठी मदत होणार आहे.
चौकट
खर्डा ग्रामपंचायतला गावातील कचरा उचलण्यासाठी तीन घंटागाड्या जरी उपलब्ध झाल्या असल्या तरी ग्रामस्थांनीही आपल्या घरातील व दारातला कचरा एकत्र साठवून तो घंटागाडीत टाकावा. व आपला परिसर व गाव स्वच्छ कसा राहील याची काळजी घ्यावी.
सौ. संजीवनी पाटील,
सरपंच : ग्रामपंचायत खर्डा
No comments:
Post a Comment