पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३० ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनमध्ये 'खाकी विथ राखी' म्हणून रक्षाबंधन साजरा करण्यात आला असून खर्ड्यातील लहान मुलींनी पोलिसांना राख्या बांधून रक्षाबंधन अगदी उत्साहात साजरा केला.
तसेच "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीद वाक्य जपत अविरत समाजाची सेवा व रक्षण करणाऱ्या पोलीस बांधवांप्रति या लहान मुलींनी कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस हे सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या पोलीस बांधवाचे त्यांनी यावेळी आभार मानले .समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस बांधवांना कोणताही सण साजरा करता येत नाही. घरापासून लांब असलेल्या या पोलिसांना काही काळ जिव्हाळ्याचा क्षण अनुभवता यावा आणि समाजव्यवस्था आणि त्यांच्यात विश्वासाचे, जिव्हाळयाचे नाते अतूट व्हावे या उद्देशाने.आज खर्डा येथील पोलीस स्टेशनमध्ये कुमारी अनघा लक्ष्मीकांत देशमुख, श्रद्धा महेश लोंढे ,ज्ञानेश्वरी राजेंद्र गोलेकर, विरण्या धनंजय सुरवसे,.या लहान मुलींनी पोलीस नाईक संभाजी शेंडे ,पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के, पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खाडे ,पोलीस कॉन्स्टेबल विष्णू आवारे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे सर्व पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.
यावेळी उपस्थित पत्रकार धनसिंग साळुंके, फोटोग्राफर शेखर देशमुख, सोनाजी सुरवसे आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment