पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ९ सप्टेंबर
भाजपच्या नेत्या संघर्षकन्या पंकजाताई मुंडे यांचा खर्डा भाजपाच्या वतीने भव्य सत्कार व पंकजाताई यांच्या हस्ते "मुंडेसाहेब प्रवेशद्वार" या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन करून
शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे स्वागत करण्यात आले.
भाजपच्या नेत्या संघर्षकन्या पंकजाताई मुंडे यांची ४ सप्टेंबर रोजी निघालेली शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज दि. ९ रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आली होती. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या चाहते व खर्डा भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय थाटामाटात खर्डा बसस्थानकावर पंकजा मुंडे यांचा भाजापा कार्यकर्ते व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे चाहते यांच्या वतीने भव्य दिव्य असा नागरी सत्कार करण्यात आला. क्रेनच्या साहाय्याने भव्य असा हार घालून त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मोठ्या वाद्यवृंदांच्या व फटाक्यांच्या आवाजाने यावेळी परिसर दणाणून गेला होता. यावेळी बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे, खा. सुजय विखे पाटील व आ. राम शिंदे यांचेसह खर्ड्यातील सर्व भाजप कार्यकर्ते व गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान खर्डा येथुन नागोबाच्या वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याचे प्रवेशद्वाराचे नाव "मुंडेसाहेब प्रवेशद्वार "असे करण्यात आले असून त्या प्रवेशद्वाराचेही उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
चौकट
मात्र एकीकडे पंकजा मुंढे व स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या वरती प्रेम करणारे त्यांचे चाहते नाराज झाल्याचे दिसून आले. कारण आज खर्डा येथील गीते बाबा समाधीकडे मंदिर येथे पंकजाताई मुंडे यांचा सार्वजनिक सत्कार, मार्गदर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र एकच सार्वजनिक सत्कार स्विकारल्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी कोणाचेही सत्कार स्वीकारले नाही. त्यामुळे सकाळपासून सत्कार व मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेल्या मुंडे साहेबांवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांची मने दुखावली गेली . ताईंनी आमच्यासोबत फक्त दोन शब्द बोलून आभार तरी व्यक्त करायचे होते. असे सर्वसामान्य आलेले नागरिकांचे मत होते सकाळपासून आम्ही त्यांची वाट पाहत होतो व महाप्रसादाचे पण आयोजन केले होते. पंकजा ताई न थांबल्यामुळे नागरिक नाराज भावना व्यक्त करताना दिसून आले .
No comments:
Post a Comment