पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१४ सप्टेंबर
यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट असताना सुद्धा खर्डा हद्दीतील सोनेगाव येथे बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोनेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ गायवळ व सचिन सर गायवळ यांच्या वतीने त्यांच्या शेतातील फार्म हाऊस वरून डीजे साऊंड सिस्टिम वर नर्तिका नाचत व हलगी ताशाच्या आवाजात वाजत गाजत मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला .
सोनेगावमध्ये आल्यानंतर सर्व गावकरी एकत्र येऊन भव्य मोठी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीने सोनेगावकरांचे मात्र लक्ष वेधून घेतले होते, यावेळी जामखेड तालुक्यातील विविध गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे चेअरमन,व असंख्य गायवळ बंधू वर प्रेम करणारे कार्यकर्ते,महिला भगिनी व सोनेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment