पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३ सप्टेंबर
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद दुसऱ्या दिवशीही ३ सप्टेंबर रोजी खर्डा शहरात उमटले.या घटनेच्या निषेधार्थ खर्डा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मराठाआरक्षणासंदर्भात उपोषण सुरू होते. आंदोलनादरम्यान १ सप्टेंबर रोजी आंदोलकांवर लाठीहल्ला झाल्याने यात अनेकजण गंभीर जखमी झाले. या आंदोलनामुळे मराठा समाजात असंतोषाची लाट निर्माण झाली असून, खर्डा शहरात पडसाद उमटत आहेत.
शनिवारी (दि.२) सकल मराठा समाजाच्या वतीने खर्डा शहर बंदचे पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आवाहन केले होते .
या घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करावी, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, मराठा समाजाची माफी मागावी, मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या.शहरात रस्त्यावर उतरुन घटनेचा निषेध नोंदविला होता.
त्या आव्हानाला प्रतिसाद देत अत्यावशक सेवा वगळता ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने कडकडीत बंद ठेवून सहकार्य केले .आज रविवारी दि.३ रोजी खर्डा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
यासंदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता .
No comments:
Post a Comment