पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१०सप्टेंबर
राज्याला हादरवून टाकणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याने येरवडा कारागृहात आज पहाटे गळफास घेऊन त्याने आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला. मागील पाच वर्षांपासून तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत होता. कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन आरोपींना नगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २०१७ ला दोषी ठरविलं होतं.
आरोपी जितेंद्र शिंदे याने आज पहाटेच्या सुमारास गळफास घेतल्यानंतर काही वेळातच ही माहिती तुरुंग प्रशासनाला कळाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली. दरम्यान, आरोपी जितेंद्र शिंदे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेल्याची माहिती आहे.
No comments:
Post a Comment