पोलीस वारंट न्यूज नेटवर्क : ७ सप्टेंबर
ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला म्हणून सरपंचाने केलेल्या मारहाणीत ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्या प्रकरणी सरपंचांसह दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
या बाबत मयत ग्रामपंचायत सदस्या गणेश रावसाहेब रावण (वय ३२) ची आई फिर्यादी रेखा रावसाहेब रावण (वय ५२) यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझा मुलगा गणेश रावसाहेब रावण (वय ३२) सन २०२१ च्या घोडेगाव ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला होता. तो व सरपंच शरद जगताप एकाच प्रभागातून निवडून आले होते. यानंतर सरपंचपदासाठी गणेशने शरद जगताप यास मतदान केले होते. व वर्षानंतर गणेशला सरपंच करायचे ठरले होते. मात्र एक वर्षाची मुदत संपुनही सरपंच शरद जगताप याने सरपंच पदाचा राजीनामा दिला नाही. यामुळे मयत गणेश रावण व सरपंच शरद जगताप यांच्यात सतत भांडणे होत होते.
दरम्यान दि. ३० जून २०२३ रोजी गणेश हा सकाळी १० वाजता घोडेगाव ग्रामपंचायत मध्ये मिटींग होती. यासाठी गणेश रावण हा
ग्रामपंचायत कार्यालयात गेला होता. ग्रामपंचायत मध्ये सरपंच शरद जगताप, उपसरपंच शमशाद शौकत मुलानी ग्रामसेवक रामदास गोरे हजर होते. यावेळी मागील खर्चाचा हिशोब मागितल्यावरून सरपंच व माझी वादावादी झाली मी घरी येत असताना घोडेगाव खुरदैठण रस्त्यावरील पुलाजवळ सरपंच शरद जगताप व शौकत सैदु मुलानी आले व मोटारसायकल आडवी लावून तु हिशोब मागतो काय म्हणत शिवीगाळ करत आमच्या नादी लागला तर तुला सोडणार नाही म्हणून शौकत मुलानी यांने गंचाडी पकडून हाताने कानाखाली मारहाण केली यावेळी शरद जगताप याने हाताने पाठीमागून डोक्यावर मारहाण केली यावेळी जालिंदर कल्याण भोंडवे हे जवळून जात असताना त्यांनी आमचे भांडण सोडवले मला झालेल्या मारहाणीमुळे माझे डोके दुखत आहे. त्यांनी केलेल्या मारहाणी मुळेच मयत गणेश याचे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन तो उपचारा दरम्यान मयत झाला आहे. यानुसार मयत गणेशची आई रेखा रावसाहेब रावण (वय ५२) दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा.रजि.नं व कलम I 164/2023 भा.द.वि. 302,341,504,506,34 प्रमाणे आरोपी शरद भास्कर जगताप
2.शौकत सैदु मुलाणी दोघे रा.घोडेगाव ता.जामखेड यांचेवर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.
ही घटना दि. ३० जून २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजताचे सुमारास घडली होती. या घटनेचा सखोल तपास करत असताना मिळालेल्या पुराव्यावरून खर्डा पोलीसांकडून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment