पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ८ सप्टेंबर
भाजपच्या नेत्या संघर्षकन्या पंकजाताई मुंडे यांची ४ सप्टेंबर रोजी निघालेली शिवशक्ती परिक्रमा यात्रा उद्या दि. ९ रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे येणार असून या यात्रे दरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या चाहते व खर्डा भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची भव्य तयारी करण्यात आली असून पंचक्रोशीतील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपा युवक नेते बाजीराव गोपाळघरे यांनी दिली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. पंकजा मुंडे या यात्रेच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील अनेक जिल्हे पिंजून काढणार आहे. विविध धार्मिकस्थळे आणि शक्तीपिठांना भेट देणार आहेत. जनतेशी संवादही साधणार आहेत. त्यांच्या या यात्रेने भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या यात्रेची आठवणही केली जात आहे. पंकजा मुंडे यांच्या या शिवशक्ती परिक्रमा यात्रे दरम्यान जामखेड रोडवरील लोणी फाटा ते खर्डा मोटारसायकल रॅली निघणार असून ही रॅली खर्डा येथील
सिध्दसंत सिताराम गडावर येऊन. तर सिताराम गड ते खर्डा बसस्थानक अशी कार्यकर्ते व नागरिकांची भव्य रॅली निघणार असून खर्डा बसस्थानक येथे पंकजाताईचा भव्य नागरी सत्कार व खर्डा बसस्थानकावर निर्माण करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर गितेबाबा समाधीकडे प्रस्थान तेथे सार्वजनिक सत्कार कार्यक्रम व मार्गदर्शन व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व कार्यक्रमांसाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment