पोलीस वारंट न्यूज नेटवर्क- ३१ ऑक्टोबर
मराठा आरक्षणासाठी जामखेड तालुक्यातील खर्डा शहर कडकडीत बंद असून ,काल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून काल खर्डा बंदची हाक देण्यात आली होती . बंदसाठी रीतसर निवेदन खर्डा पोलीस स्टेशनला सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर आज खर्डा शहर हे शंभर टक्के बंद असल्याचे दिसून आले आहे.
मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण ,महिलांचे उपोषण, कॅन्डल मार्च आणि आज बंद करण्यात आला आहे तसेच जामखेड तालुक्यासह खर्ड्यात सर्व समाजाच्या नागिरकांनी बंदला पाठिंबा दिला आहे . व्यापारी वर्गाने आपापली दुकाने स्वतःहून बंद ठेवून मराठा आरक्षणास पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी "मराठा योद्धा" मनोज जरांगे पाटील हे गेल्या सात दिवसापासून अन्न पाण्याचा त्याग करून मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून उपोषणास बसले आहेत . आतापर्यंत सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेतली नसून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनत चाललेली आहे , मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून आज जामखेड तालुका बंद ठेवण्यात आला आहे . व ह्या बंदला जामखेड तालुक्यातील खर्ड्यात उस्तुर्फ प्रतिसाद मिळालेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा