पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२९ ऑक्टोबर
गेली सहा दिवसांपासून उपोषणास बसलेल्या मराठा योद्धा मनोज जरंगे यांच्या अंदोलनाला पाठिंबा व आरक्षण मिळावे यासाठी उद्या दि. ३१ ऑक्टोबर रोजी जामखेड तालुका बंदचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबतचे रितसर निवेदन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व तहीसलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले असून यात म्हटले आहे की, मराठा योद्धा मनोज जरंगे हे गेल्या सहा दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. मराठा आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी हे प्राणांतिक उपोषण सुरू केले असून सरकारने त्याबाबत काही दखल घेतली नाही. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. मात्र या निर्दयी सरकारला जाग येण्यासाठी उद्या जामखेड तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment