पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/20 मार्च 2025
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथील बस स्थानकासमोरील जुने महावितरण कार्यालय, तलाठी कार्यालय आणि १९६९ साली बांधलेली शासकीय गोदामाची इमारत दि 18/3/2025 रोजी पाडण्यात आली आहे या प्रकरणाने खर्डा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ग्रामस्थांनी या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, खर्डा रोडलगत नदी पात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जामखेड तहसिल कार्यालय,जामखेड पोलीस स्टेशन, महसूल विभाग जामखेड व खर्डा ग्रामपंचायत यांच्याकडे केली आहे अन्यथा खर्डा ग्रामस्थांनी उपोषनाचा इशारा दिला आहे .यावेळी उमेश गुरसाळी, शिवाजी भोसले,संभाजी भोसले,कोठावळे,अनिल राऊत, भोसले, दत्तात्रय भोसले, खेडकर ,उमेश गुरसाळी,
सदर निवेदनात खर्डा ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज सादर केला आहे. त्यात म्हटले आहे की खर्ड्यातील शासकीय गोदामाच्या इमारतीतील साहित्य काढून भंगार विक्री केली गेली आणि नंतर इमारत पाडण्यात आली. या प्रकरणात श्रीमती ज्योती शिरीष गोलेकर आणि तिचा मुलगा संग्राम शिरीष गोलेकर यांचा सहभाग आहे. दि 18/03/2025 रोजी संपूर्ण इमारत जे.सी. बी. वाहनाच्या साह्याने उदवस्त केली गेली आहे तसेच जे. सी. बी च्या साह्याने गोदाम पाडत असताना जवळील गाळेधारकांनी विचारणा केली असता अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दहशत माजवण्याचा प्रयत्न महिला व तिच्या मुलाकडून झाला आहे तसेच गाळे धारकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. स्मशानभूमीकडे जाणारा रोडवरती नदी पात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम करून नदीचे पात्र कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गोदामाचे साहित्य विक्री व पडझड तसेच नदी पात्रातील अतिक्रमण करून गाळे बांधकाम केले गेले आहे. हा सर्व प्रकार श्रीमती ज्योती शिरीष गोलेकर व मुलगा संग्राम शिरीष गोलेकर यांनी उभा राहून खर्डा याठिकाणी आमचे समक्ष केले आहे. तसेच गोडाऊन पडझडी कामी जे. सी. बी. मालक सुमित चावणे व जे. सी. बी. चालक तुकाराम सुरवसे यांनी गोडाऊन पडण्यास मदत केली आहे तरी आम्हा सर्व खर्डा ग्रामस्थांची विनंती आहे. की जामखेडचे तहसीलदार यांनी या सर्व प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून या लोकांवरती लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही ग्रामस्थ आमरण उपोषणासाठी दिनांक २७/०३/२०२५ रोजी पासून तहसील कार्यालय जामखेड येथे बसू. या गोष्टीची दखल न घेतल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील. असा इशारा देऊन ग्रामस्थांनी या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
तहसीलदार यांनी या सर्व प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून या लोकांवरती लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही ग्रामस्थ आमरण उपोषणासाठी दिनांक २७/०३/२०२५ रोजी पासून तहसील कार्यालय जामखेड येथे बसू. या गोष्टीची दखल न घेतल्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील." अशी खर्डा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
तसेच खर्डा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यासाठी तैयार असून पुरवठा अधिकार सदर प्रकरणाकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने खर्डा ग्रामस्थांमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोट-
खर्डा शहरांमधील 1969 साली शासकीय गोडाऊनची बांधणी झाली असताना त्या पुरवठा विभागाचे गोडाऊन मागील दोन दिवसांपूर्वी श्रीमती ज्योती शिरीष गोलेकर व त्यांचे सुपुत्र संग्राम शिरीष गोलेकर यांनी मिळून त्या इमारतीवरील पत्रे व लोखंडे अँगल तसेच शटर फरशी व सर्व साहित्य हे भंगार मध्ये विकले गेले आहे व जेसीबीच्या साह्याने इमारत जमीन उध्वस्त करण्यात आली आहे हे प्रकरण काल दि 18 मार्च रोजी भरदिवसा घडले आहे तेथील गाळेधारकांचे चार-पाच गाळे जीसीबी च्या साह्याने पाडले असून गाळेधारक व ग्रामस्थांसमोर त्या महिलेने गलिच्छ व अरेरावी भाषेत शिवीगाळ केली व "माझं कुणी काहीच करू शकत नाही आतापर्यंत मला कोणी काहीच केलं नाही तर आता काय कोण करणार आहे " अशा पद्धतीने उद्धट भाषेत अरेरावी करून महिला असल्याचा फायदा घेत सर्व ग्रामस्थांना धमकी दिली व त्या महिलेला संविधानाचा कसलाही धाक उरलेला नसून कसलाही प्रशासनाचा धाक त्या महिलेवर नाही असे दिसून येते आहे. लवकरात लवकर सदर विषयावर प्रशासनाने तोडगा काढून व त्या माहिलेवर गुन्हा दाखल करून आम्हा खर्डा ग्रामस्थांना न्याय देण्यात यावा
शिवाजी भोसले
कोट
खर्डा येथील शासकीय गोदाम पाडण्याच्या प्रकरणातून ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच, नदी पात्रात अतिक्रमण करून गाळे बांधकाम केल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील कायदेशीर कारवाई होण्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून आता
कायदेशीर कारवाई होणार? प्रशासन सर्वसामान्य नागरिकांची दखल घेणार का? ग्रामस्थांना न्याय मिळनार का? याकडे सर्व खर्डा व जामखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा