जामखेड प्रतिनधी/२० मार्च २०२५
जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळणार आहे. शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत कारवाई करण्यात येणार असून, या प्रक्रियेतून शहरातील वाहतूक व्यवस्था आणि विकासकामांना चांगली गती मिळेल. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे झालेल्या अपघातांची चौकशी सुरू असून, दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
बुधवार काल दि 19 मार्च रोजी जामखेड तहसील कार्यालयात महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीस तहसीलदार गणेश माळी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी शेळके, लोभाजी घटमळ, मुख्याधिकारी अजय साळवे, पोलिस निरीक्षक महेश पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे काम आता गती घेणार असून, शहरातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. या संदर्भात तहसीलदार गणेश माळी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी शेळके, मुख्याधिकारी अजय साळवे आणि पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक झाली. खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतची पक्की अतिक्रमणे २५ मार्च रोजी हटवली जाणार आहेत. रितसर मोजणी करून अतिक्रमण हटवले जाईल आणि लगेचच भुयारी गटार तसेच पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू होईल.
जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे अनेक अपघात झाले आहेत, ज्यामुळे अनेक जणांना प्राणही गमवावे लागले आहेत. या संदर्भात पोलिस व महसूल विभागाच्या वतीने चौकशी सुरू असून, दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बीड कॉर्नर ते समर्थ हॉस्पिटल रस्त्याचे काम सुरू झाले असून, विंचरणा नदीच्या पुलावरील एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. सौताडा घाटातील 1200 मीटरचा रस्ता रुंदीकरणाच्या प्रक्रियेत आहे. या सर्व प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारेल आणि नागरिकांना चांगली सुविधा मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा