खर्डा प्रतिनधी/१८ मार्च२०२५
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नाहुली येथे सेवा संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाहुली येथील बाळु नामदेव खवळे यांना जातीवाचक शिविगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना दि.15 मार्च 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता जामखेड तालुक्यातील नाहुली येथे जयराम जाधव यांच्या वेल्डींगच्या दुकानासमोर घडली आहे. फिर्यादी बाळू नामदेव खवळे यांनी खर्डा पोलीस स्टेशनला चार जणांनवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सदर प्रकरणी दि 16 मार्च 2025 रोजी फिर्यादी बाळु नामदेव खवळे रा. नाहुली ता. जामखेड यांनी खर्डा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे . त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी क्र.1 सोपान गोरख जाधव याने जातीवाचक शिविगाळ करून हाताचे चापटाने मारहाण केली, तर आरोपी क्र.2 अशोक नवनाथ जाधव याने लाकडी दांडक्याने मारले, आरोपी क्र.3 बापुराव बाबासाहेब जाधव याने दगडाने मारले आणि आरोपी क्र.4 विनोद दिलीप बहीर याने लाथाबुक्क्यांनी मारले. आरोपी क्र.1 याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी फिर्याद बाळु नामदेव खवळे रा. नाहुली यांनी खर्डा पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे हे करत असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(2), 118(1), 115(2), 351(2), 351(3), 352, 3(5) आणि अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va) प्रमाणे ॲट्रॉसिटी अंतर्गत खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे हे करत आहेत.
फिर्यादी बाळु नामदेव खवळे यांना समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
चौकट
या घटनेमुळे स्थानिक समाजात संतापाचे वातावरण आहे. अशा घटनांमुळे समाजातील सामाजिक सौहार्द बिघडू शकते, ही चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पारदर्शकपणे करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा