खर्डा प्रतिनधी 17 मार्च 2025
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत खर्डा ग्रामपंचायत असून सद्या ग्रामपंचायत ही भाजपाच्या ताब्यात असून सत्ताधारी असणारे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ग्रामपंचायतची सत्ता खेचून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाणारे माजी सरपंच संजय गोपाळघरे यांच्यावरच उपोषणाची वेळ आल्याने खर्डा ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी सरपंच संजय गोपाळघरे यांनी जलजीवन पाणी योजनेच्या कामांमध्ये विलंब झाल्याने उपोषणाचा इशारा दिला आहे. संजय गोपाळघरे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की नागोबाचीवाडी येथील पाण्याच्या टाकीचे काम काही विघ्नसंतोषी लोकांमुळे नागोबाचीवाडी येथील पूर्ण गावाला वेठीस धरण्यात येत आहे. ही योजना खर्डा शहर व वाड्या वस्त्यांसाठी 22 कोटी रुपयांची वरदान ठरणारी होती, परंतु त्याचे कामे अद्यापही अपूर्ण आहेत.
खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन पाणी योजनेच्या आराखड्यामध्ये वाड्या वस्त्यांचा समावेश झाला आहे. नागोबाचीवाडी येथील पाण्याच्या टाकीसाठी जागेचे बक्षीस पत्र एक वर्षांपूर्वी देण्यात आले होते, परंतु अद्याप काम सुरू झाले नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.माजी सरपंच संजय गोपाळघरे यांनी ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हे काम दोन दिवसात मार्गी लावावे अन्यथा 20 मार्च 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. ही उपोषणाची प्रती तहसीलदार, गटविकास अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक व ग्रामपंचायत यांना देण्यात आल्या आहेत.
चौकट
जलजीवन पाणी योजनेच्या कामांमध्ये विलंबामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. नागोबाचीवाडी येथील पाण्याच्या टाकीचे काम सुरू न झाल्याने पूर्ण गाव वेठीस धरण्यात येत आहे. या विलंबामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा