मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या अंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर विविध पध्दतीने अंदोलन केले जात असून जामखेड तालुक्यातील खर्डा येथील बसस्थानकासमोर मराठा आरक्षणाकरिता साखळी उपोषण चालू आहे . जामखेड तालुक्यातील विविध गावांमधील मराठा बांधव गेली सात दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत. तसेच विविध समाज घटक व संघटनाचाही या अंदोलनास पाठिंबा दिला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दि. १ नोव्हेंबर रोजी वंजारी समाज खर्डा गटाच्या वतीने खर्डा बसस्थानकासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणास स्थळी निवेदन देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे .
यावेळी उपस्थित माजी सरपंच संजय गोपाळघरे , माजी सरपंच आसाराम गोपाळघरे ,तात्याराम होडशिळ , बाबासाहेब होडशीळ , डॉ.जयराम खोत , केशव वणवे, केशव नागरगोजे ,आण्णा खाडे, भारत सानप, बाबासाहेब बांगर, एकनाथ गोपाळघरे, प्रभाकर गोपाळघरे, बलराम गोपाळघरे , धनंजय होडशीळ , दादाहारी चौधार यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला असून यावेळी मोठ्या संख्येने वंजारी समाज उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा