पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३ नोव्हेंबर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांपासून जरांगे पाटिल हे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण लागु करण्यासाठी जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातुन सकल मराठा समाज महिलांच्या वतीने काढण्यात आलेल्या कॅन्डलमार्च मध्ये मोठ्या संख्येने महीलांनी हातात पेटतील मेनबत्ती घेऊन शहरातुन सहभागी होत मराठा आरक्षणाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत किंवा मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण द्यावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर खर्ड्यामध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या साखळी उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र अजुनही सरकारला जाग आलेली नाही. याच अनुषंगाने आज सायंकाळी ७:०० वाजता खर्डा शहरातुन जरांगे पाटील यांच्या अंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महीलांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.
कॅन्डल मार्चमध्ये महीला व मुली खर्डा येथील बसस्थानकासमोरील साखळी उपोषण स्थळापासून खर्डा शहरातील मुख्य रस्त्याने सकल मराठा समाजातील महिला जमा झाल्या होत्या. यावेळी या सर्व महीलांनी हातात मेणबत्ती पेटवून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा दिल्या. यानंतर हा कॅन्डल मार्च आल्या नंतर सर्व महीला व मुलींनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत सरकारचा निषेध केला. शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत म्हणून करण्यात आला.
No comments:
Post a Comment