पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-६ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जातेगाव फाटा खर्डा येथे मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगेंचे क्रेनच्या साह्याने हार घालून सर्व कार्यकर्ते, ग्रामस्थ व सर्व समाज बांधवांच्या हस्ते मोठे जंगी स्वागत करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांची पुढील सभा ही जामखेड येथे आयोजित केलेली आहे .या सभेसाठी जात असताना त्यांचे खर्डेकरांच्या वतीने खर्डा येथील जातेगाव फाटा येथे थांबवुन स्वागत मोठे करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित सर्व समाजातील नागरिक,युवक कार्यकर्ते सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्नावर अंतरवली सराटी गावापासून महाराष्ट्रभर रान पेटवले आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग गावागावात, घराघरात पोहोचली आहे. ४० दिवसात आरक्षण देण्याचे सरकारने जाहीर केल्यानंतर गावोगावी साखळी उपोषणे सुरू आहेत. वडवणी तालुक्यातील ९० टक्के गावात साखळी उपोषणे सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जावून सकल मराठा बांधवांसोबत संवाद साधत आहेत. १४ ऑक्टोंबर रोजी मराठा समाजाची संवाद सभा अंतरवली सराटी येथे शंभर एकर जागेमध्ये होणार आहे. या सभेची पूर्वतयारी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यात सकल मराठा समाजाला निमंत्रित करण्यासाठी मनोज जरांगे पाटील विविध ठिकाणी सभा घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर येथे जाहीर सभा होणार आहे.यावेळी खर्ड्यात स्वागतासाठी मोठी गर्दी असल्या कारणाने खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता
चौकट...
मनोज जरांगें पाटील यांचे स्वागत करण्याकरिता सामाजिक कार्यात तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ व त्यांचे समर्थक सोनेगाव येथून खर्डा येथे ३५ फोर व्हिलर गाड्यांचा ताफा घेऊन येताना आले होते. त्यांच्यावतीने भव्य असे स्वागत यावेळी करण्यात आले.
No comments:
Post a Comment