पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ७ ऑक्टोबर
अनेक वर्षे मोर्चे व अनेक अंदोलने करूनही सरकार महाराष्ट्रील मराठा समाजाला आरक्षण देत नसल्याने समाजाचे मोठे व कधीही न भरून निघणार नुकसान होत आहे. याच पार्श्वभूमीवर
मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या सरकारचा निषेध व मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा म्हणून जामखेड तालुक्यातील महत्वाचा सोनेगाव ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सौ. रुपाली पद्माकर बिरंगळ यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे जामखेड तालुक्यात मराठा आरक्षण लढ्याला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.
मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर जनजागृती सुरू केली आहे. दररोज त्यांच्या अनेक ठिकाणी महासभा होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते काल जामखेड तालुक्यात आले होते. जामखेड तालुक्यात प्रवेश करताच खर्डा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचा मोठा सत्कार करण्यात आला आला. या दरम्यान सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ व त्यांचे समर्थक यांनी सोनेगाव येथून खर्डा येथे ३५ चारचाकी वाहनांची रॅली काढत मनोज जरांगे पाटलांचे भव्य असे स्वागत केले.
घ जामखेड तालुक्यातील राजकीय दृष्टया महत्वाची असणारी सोनेगावची ग्रामपंचायत समजली जाते. येथील सरपंच सौ. रुपाली पद्माकर बिरंगळ यांनी मराठा समाजातील मुलांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण गेल्या अनेक वर्षापासुन मिळत नाही त्यामुळे अनेक तरुणांच्या पिढ्या नं पिढ्या बुध्दी कौशल्य असुनही नोकरी न मिळाल्याने बरबाद होत चालल्या आहेत.
प्रत्येक पक्ष हा निवडणुकीत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. अशी भुमिका घेतात. परंतु सत्ता आल्यानंतर प्रत्येक सरकारने मराठा समाजाची निराशाच केलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष हा मराठा समाजाचा मतापुरताच वापर करुन घेतात व आश्वासने देऊन सत्ता मिळताच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती दिसुन येत नाही. अनेक वर्षे झाली मराठा समाज हा लाखो लोकांचे मोर्चे शांततेत काढून आमरण उपोषण करतात तर कित्येक युवकांनी आजपर्यंत आरक्षण लढ्यासाठी आत्महत्या केल्या आहेत. तरीही सरकार मराठा समाजाला आरक्षण नाही. व्यथा ऐकुण मला सुध्दा मनस्ताप होत असल्याकारणाने मला अत्यंत दुःख होत आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याच्या निषेधार्थ मी सोनेगावच्या सरपंच पदाचा राजीनामा मोठ्या उद्वेगाने देत आहे.
असे म्हणत सोनेगावच्या सरपंच सौ. रुपाली पद्माकर बिरंगळ यांनी दिला पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतेही पद स्विकारणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
याबरोबरच त्यांनी १४ ऑक्टोबर रोजी आंतरवली येथे होत असलेल्या मराठा आरक्षण महासभेसाठी उपस्थित राहुन मराठा आरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment