पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१२डिसेंबर
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांचे नेते होते, त्यांनी त्यांच्या जीवनात केलेले काम व विचार त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून पुढे घेऊन जायचे आहेत. त्यांचे काम हे नेहमीच प्रेरणा देत राहिल असे प्रतिपादन भगवानबाबा प्रतिष्ठानाच्या वतीने करणात आले .
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज लोकनेते स्व.गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त खर्डा बसस्थानकावर भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमचे पूजन सरपंच सौ. संजीवनी पाटील यांच्या हस्ते करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी वंजारी समजाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment