पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३० डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे देवाला सोडलेल्या कटाळा बैलाची शेपटी अज्ञात व्यक्तीने कोयत्याने तोडली असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरलेले आहे.
या संदर्भात शिवपट्टण युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील ग्रामसभेत खर्डा ग्रामपंचायतने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कोंडवाडा बांधण्याचा ग्रामसभेचा ठराव घेतला होता, परंतु अद्याप पर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही या प्रकरणाला सर्वस्व खर्डा ग्रामपंचायत जबाबदार असून कटाळ्या बैलावर काही अज्ञात लोक वारंवार हल्ले करतात व त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतात अशा अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन ग्रामपंचायत व अज्ञात व्यक्तीवर योग्य कारवाई करण्यात यावी . तसेच अनेक मोकाट जनावरे हे शेतातील पिकांची पण नासधूस करतात हे प्रकार लवकरच थांबले पाहिजेत. खर्डा ग्रामपंचायतने कोंडवाडा बांधून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा खर्डा ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी संकेत सातपुते, बबलू सुरवसे, ओंकार इंगळे, गणेश ढगे , कृष्णा शिंदे, विकास खरात, मिलन जगताप , नितीन आहेर , लखन जाधव इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment