पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२९ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मोटारसायकल व एसटीबसचा अपघात होवून यात मोटारसायकलवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. याबाबत खर्डा पोलिसांनी बसचालकाची फिर्याद घेऊन जखमी झालेल्या तरूणावरच गुन्हा दाखल केला. त्यामुळे बसचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून जामखेड खर्डा हैदराबाद रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एसटीबसवर दगडफेक केली.
याबाबत माहिती अशी की, दि.२७ डिसेंबर रोजी दुपारी खर्डा शहराजवळ जुपिटर मोटरसायकल व पुणे कळंब या एसटीच्या अपघातात सोनू अनिल काळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर संदीप लहू पवार हा जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, दरम्यान गुरूवारी मृत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान खर्डा पोलिसांनी बसचालकाची फिर्याद घेऊन जखमी झालेल्या सोनू पवार याच्यावरच गुन्हा दाखल केला होता.
त्यामुळे समाज संतप्त झाला त्यानंतर जमावाने दगडफेक केल्याने पुणे कळंब या एसटी बसच्या काचा फुटल्या सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. नंतर सदरचा जमावाने मृतदेह शिर्डी, हैदराबाद राज्य मार्गावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने ट्रॅफिक जाम झाली होती.
याबाबत माहिती मिळताच खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जमाव शांत करण्याचा प्रयन्त केला. अपघातग्रस्त एसटी चालकावरदेखील गुन्हा दाखल करावा व आमच्या मुलावर केलेला गुन्हा मागे घ्यावा,
अशी मागणी मृत तरूणाच्या नातेवाईकांनी केली. दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. सदरचा जमाव ऐकत नसल्याचे पाहून जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे पोलिसांची जादा कुमक घेऊन खर्डा येथे आंदोलनस्थळी पोहोचले.
त्यावेळी त्यांनी संतप्त जमावच्या तीव्र भावना ऐकून घेतल्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अपघात केलेल्या एसटी बसचा चालक अमोल अंकुश पांढरे याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
त्यावेळी या समाजातील काही तरुणांनी पोलिसांचे सर्व म्हणणे ऐकून घेत बसचालक पांढरे याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत होऊन रस्त्याच्या बाजूला झाला व अपघातात मृत्यू झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी जामखेडचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तू बेलेकर , प्रकाश जाधव , भगीरथ देशमाने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता
यावेळी जामखेडचे सामजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे हे पारधी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढताना दिसले. समन्वय साधत त्यांनी वातावरण ठीक करण्याचा प्रयत्न केला.
प्रतिक्रिया
मयताचे वडील फिर्यादी अनिल बाबू काळे यांनी तक्रार दिली असून, या गुन्ह्यातिला आरोपीची चौकशी करून , एकच आरोपी सिद्ध होणार आहे तरी पुढील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर करत आहेत
No comments:
Post a Comment