पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ११ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सर्रास सुरू असताना खर्डा पोलीसांकडून अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याने काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून ९,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींवर कारवाई केल्याने खर्डा पोलीसांच्या अवैध धंदे व गुन्हेगारी याबाबतच्या भुमिकेबद्दल चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर असे की, खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैद्य धंदे सुरू असल्याने त्या धंद्यावर कारवाई करावी यासाठी
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कारवाई करण्याचे आदेश देऊनही मागील काही महिन्यांपासून अवैद्य धंदे सुरूच होते. याबाबत पोलीस वारंटच्या माध्यमातून याबाबत आवाज उठवल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी याप्रकरणी लक्ष घातल्याने स्थानिक गुन्हे शाखेने २ डिसेंबर २०२३ रोजी देशी-विदेशी दारू अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई केली.
या कारवाईनुसार गुन्हा. रजी नं 203/23 ,65 ई प्रमाणे यश विनोद साळुंखे रा. शुक्रवार पेठ खर्डा , मुदेमाल विदेशी/ दारू २८१० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू, बालाजी बापू सुरवसे, गणेश बापू सुरवसे रा. खर्डा. मुद्देमाल 4000 रुपये किमतीची देशी विदेशी दारू , गुन्हा .रजी नं 204/23 , 12 अ प्रमाणे
शिवकुमार आसाराम काशीद राहणार शुक्रवार पेठ खर्डा मुद्देमाल 1550/रुपये रोख रक्कम , घनश्याम नारायण भोसले राहणार खर्डा गवंडे गल्ली खर्डा 1520 रुपये रक्कम सहित आरोपींकडून 9,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आणि गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यामुळे अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
चौकट
खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैद्य धंदे सुरू असताना आर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. कारवाईनंतर एक दिवस धंदे बंद ठेवून पुन्हा जैसेथेच परिस्थिती आहे. खर्डा पोलिसांच्या आशीर्वादाने धंदे सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे खर्डा शहरात समाधानाचे वातावरण पसरलेले असून पुन्हा धंदे जैसे थेच सुरू असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला अवैद्य धंदे बंद करण्यासाठी काय ऍक्शन घेतील याच्याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सदरील उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment