पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-४ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे पोलीस स्टेशन स्थापन होण्यापूर्वी अहमदनगर, धाराशिव व बीड या तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या खर्डा व परिसरात इतर जिल्ह्यातील छोटे-मोठे गुन्हे करून गुन्हेगार आश्रय घेत होते. तसेच ते या परिसरातही अनेक गुन्हे, चोऱ्या वगैरे करून गुन्हेगारांना पळून जाण्यास संधी मिळत होती., परंतु खर्डा पोलीस स्टेशन झाल्यामुळे या प्रकारांमध्ये व गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाली असून पोलीस स्टेशन मुळे नागरिकांची यापासून सुटका झाली आहे. पोलीस स्टेशन स्थापनेपासून खर्डा येथील शाळा, कॉलेज, बसस्थानक परिसर अश्या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असते. तसेच रात्रीच्या वेळी गस्त असल्यामुळे छोट्या-मोठ्या चोरांना लगाम बसला आहे.
खर्डा पोलीस स्टेशनला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून या वर्षभरातील गुन्हेगारी घटनांचा अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी लेखाजोखा घेऊन समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. याबरोबरच पुढील काळात खर्डा पोलीसांच्या कार्यपद्धतीत आणखी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच खर्डा पोलीस स्टेशनची इमारत ही भाडोत्री जागेवर आहे. तर येथे पोलीस वसाहतीही नाही. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून सोयीसुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment