पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३० जानेवारी
या बाबत सविस्तर असे की, दि. २६ जानेवारी रोजी राहुरी येथील अॅड. राजाराम आढाव दांपत्याच्या निर्घृणपणे खुनाच्या संदर्भात जामखेड तालुका वकील संघाच्या वतीने तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राहुरी न्यायालयातील प्रॅक्टिस करणारे अॅड. राजाराम आढाव व त्यांची पत्नी अॅड. मनिषा आढाव यांची अमानुष अशी निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ दि. २६ जानेवारी रोजी न्यायालयाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याचे जामखेड वकील संघाने सर्वानुमते ठराव केला. तसेच या गुन्ह्याचा तपास सी.आय.डी. मार्फत व्हावा. त्याच बरोबर (Advocate Act) हा केंद्रीय सरकारणे मंजुर केलेला कायदा आहे. कायदा व सुव्यवस्था ही राज्य सरकारची अखत्यारीतील बाब आहे. तसेच राज्यातील वकीलांच्या संदर्भातील गुन्हयांची संख्या वाढली असल्याने राज्यात केंद्राचे मंजुरीकरीतां पाठविलेले (Advocate Protection Act) चे संदर्भात दोन्ही सरकारच्या पातळीवर सकारात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. कारण सरकार वकीलांवरील गुन्हयांची संख्या वाढण्याची वाट बघत आहे. असा संदेश समाजामध्ये जात आहे. त्याअनुषंगाने विचार करून कायदा करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली.
यावेळी जामखेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍड- शमा हाजी कादर म्हणाले की, राहुरी येथील अॅड. राजाराम आढाव दांपत्य व इतर गुन्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेमध्ये ढिसाळपणा असल्याने आरोपींचे मनोबल वाढत आहे. राहुरी हत्याकांडमध्ये संबधीत तपास यंत्रणांनी तपासात कोणतीही त्रुटी ठेवू नये. व सदरील गुन्हा हा जलदगती कोर्टात चालवावा व सदरील गुन्हा विषेश असल्याने मयत दाम्पत्यांतर्फे वकील म्हणून अॅड. उज्वल निकम यांची नेमणूक करण्याची मागणी त्यांनी केली. त्याच बरोबर वकीलांवर वाढते हल्ले पाहता वकिलांना संरक्षण मिळावे यासाठी (Advocate Protection Act) हा कायदा लागू व्हावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी जामखेड वकील संघाचे निवेदन स्वीकारून वकील संघाच्या भावना व सर्व मागण्या शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले. या वेळी आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. वकील संरक्षण कायदा लागू झालाच पाहिजे. अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या या वेळी जामखेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, व सर्व सदस्य उपस्थित होते
चौकट
राहुरी येथील अॅड. राजाराम आढाव दांपत्याच्या निर्घृणपणे झालेल्या खुनाची सी. आय. डी. चौकशी करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत एक दिवशीय न्यायालयीन कामकाज बंद ठेवून जामखेड वकील संघाकडून सदर खूनाचे आरोपी व घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच यासह इतर मागण्यांसंदर्भातही आज दि. २६ जानेवारी रोजी तहसीलदार योगेश चंद्रे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment