पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-५ जानेवारी
पोस्ट खाते १०० टक्के पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त आहे. शासनाच्या विविध योजनांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना व पोस्ट विभागाच्या सर्व योजना पत्रकारांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सर्वतोपरी काम करण्याचे आश्वासन देण्याबरोबरच पोस्टाच्या बँकिंग सेवा, विमा यासह विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख यांनी केले.
जामखेड येथिल पोस्ट कार्यालयात पत्रकार दिनाच्या पूर्व संध्येला जामखेड पोस्ट कार्यालयात पत्रकारारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी आरती रेडेकर संपादित सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील "साऊ" हे पुस्तक, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोस्ट विभागाचे कर्जत उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, पोस्ट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक अमोल भुमकर, पत्रकार मिठूलाल नवलाखा, संजय वारभोग, श्वेता गायकवाड, धनराज पवार, नासिर सय्यद, समीर शेख, निवृत सेवक निवृत्ती मोरे आदिंसह जामखेडचे पोस्टमास्तर अविनाश ओतारी, बळी जायभाय, गणेश जगताप, सुर्यकांत शिंदे, जगन्नाथ हंबीरराव, मोहन पंडीत, दादा धस, आनंद कात्रजकर, वेदशास्त्री वाकळे, राजकुमार कुलकर्णी, सुरज खंडागळे, अन्सार शेख, गणेश हजारे आदींसह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार मिठूलाल नवलाखा, संजय वारभोग, श्वेता गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जगताप, बळी जायभाय यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment