पोलीस वारंट न्यूज नेटवर्क ४ जानेवारी
रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय मध्ये जामखेड पोलीस विभाग स्थापना दिनाच्या अनुषंगाने शस्त्र प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. आयोजन जामखेड पोलीस विभाग व 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अ नगर नागेश विद्यालय युनिट यांच्या विद्यमाने करण्यात आले. पोलीस स्थापना दिवस विविध उपक्रमाचे चे उद्घाटन पोलीस निरीक्षक महेश पाटील हस्ते झाले प्रमुख उपस्थिती नूतन पीएसआय गायत्री भूषण राळेभात, भूषण राळेभात, नामदेव राळेभात प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के., पर्यवेक्षक संजय हजारे, एनसीसी ऑफिसर मयुर भोसले, पोलीस हवालदार प्रवीण इंगळे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव. गुरुकुल प्रमुख संतोष ससाने प्रा विनोद सासवडकर, साळुंखे बी. एस आदी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस हवालदार प्रवीण इंगळे व अविनाश ढेरे गोपनीय शाखा यांनी एनसीसी कॅडेट व विद्यार्थी विद्यार्थिनींना पोलीस विभागातील विविध शस्त्र, एस एल आर, कार्बाईन, पिस्टल, शॉर्ट गण, गॅस गन, या सर्व शास्त्राच्या विविध भागांची व शास्त्राची माहिती सांगून यांची एनसीसी विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश जाधव यांनी सर्व शिक्षकांना विविध शस्त्रांची माहिती दिली
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले नवीन वर्षात विद्यार्थ्यांनी चांगला संकल्प करावा स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करावा पोलीस वर्धापन दिनानिमित्त कार्यशाळा योजनेचे उत्कृष्ट नियोजन केले. मी एक एनसीसी कॅडेट आहे एनसीसी यांना अभ्यासक्रमामध्ये या शस्त्रांची माहिती आहे. नागेश विद्यालय एनसीसी युनिट चांगले आहे. विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त केले पाहिजे विद्यार्थ्यांची महत्त्वाचे तीन कामे अभ्यास व्यायाम चांगले संस्कार या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे सर्व विषयांचा अभ्यास सातत्यपूर्णाने केला पाहिजे. शिकत असताना सर्व विषयांचा प्राथमिक अभ्यास आहे. महत्त्वपूर्ण करावा.
विद्यार्थ्यांनी जीवनात मोबाईलचा वापर कमी करावा व अभ्यास सातत्य पूर्ण करावा, विद्यार्थ्यांनी दोन तास अभ्यासा करावा. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. मुलांच्या सुरक्षतेसाठी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना कोणी त्रास देत असेल लैंगिक छळ करत असेल तर अशी माहिती आई- वडील शिक्षक पोलीस प्रशासनाला माहिती देणे आवश्यक आहे. मुलींनी रस्त्यातून जाताना छेडछाड झाली तर त्याची तक्रार लगेच करावी. चांगला स्पर्श वाईट स्पर्श याची सगळ्यांना माहिती द्या. नशा मुक्ती समाजाची सर्वांनी जनजागृती करावी शालेय परिसरात व्यसन बंदी आहे. व्यसन सदृश्य साहित्य विकत असेल त्यावर पोलीस प्रशासनकडे कारवाई करणार
महिला मुली दिन दुबळे यांना कायद्याचे संरक्षण आहे अडचणी आल्यास आम्हाला संपर्क करावा. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त २ जानेवारी १९६१ साली माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलास ध्वज दिला. आपण सर्वही सर्वांनी कायद्याचे पालन व जे व्यक्ती कायद्याचे पालन करत नाही त्यांची माहिती पोलीस विभागास द्यावी. वाहतूक सुरक्षा संदर्भात नियमांचे सर्वांनी पालन करावे. राष्ट्राच्या योगदानात विद्यार्थ्यांची महत्त्वाची भूमिका आहे. अभ्यासाचे नियोजन टाईम टेबल जर सर्वांनी व्यवस्थित करावा. असे मनोगत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी ऑफिसर मयूर भोसले यांनी केले. सूत्रसंचालन संभाषण संभाजी इंगळे व आभार प्रदर्शन संतोष ससाने यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस नाईक अविनाश ढेरे गोपनीय शाखा यांनी केले होते. यावेळी नूतन पी.एस.आय गायत्री राळेभात व भूषण राळेभात , नामदेव राळेभात परिवाराचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment