पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-४ मार्च
कर्जत-जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कर्जत जामखेड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उन्हाच्या कडाक्याबरोबरच पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. जेव्हा जेव्हा पाणी टंचाई जाणवली रोहित पवार यांनी शासकीय मदतीची वाट न बघता टॅंकर सुरू केले आहेत. नजीकच्या काळात रोहित पवार यांनी पाण्यावर मोठं काम केलंय. जमिनीतील जलसाठा वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर १ मार्चपासून कुकडीचं आवर्तनदेखील सुरु करण्यात आलंय, त्यामुळे कर्जत जामखेड तालुक्यातील अनेक गावांचा शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय. गेल्या साडेचार वर्षात जिथे कुठे टँकरची गरज पडलीय तिथं टँकर देण्याचं काम रोहित पवारांनी केलंय आणि आताही देत आहेत
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून दोन्ही तालुक्यातील सुमारे २० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी त्यांच्या संपर्क कार्यालयात वेगळा पाणीटंचाई कक्ष स्थापण करण्यात आला असून ग्रामस्थांनी मागणी केल्यास त्याची तातडीने दखल घेऊन त्या गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे . जिथे कुठे नागरिकांना पाण्याची अडचण आहे त्याठीकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये कर्जत तालुक्यातील १५ गावांचा तर जामखेडमधील ५ गावांचा सामावेश आहे. कर्जत तालुक्यातील देमनवाडी, करपडी, डिकसळ, राशीन (शेटे वस्ती, मोढळे वस्ती, मोहिते वस्ती, बरबडे वस्ती), टाकळी खंदेश्र्वरी, गोयकरवाडा, सोनाळवाडी (सौताडे वस्ती, जाधव वस्ती), तळवडी, पठारवाडी, शिंदेवाडी, परीटवाडी, चांदे खूर्द, कापरेवाडी, सितपूर आणि बारडगाव सुद्रिक या गावांमध्ये आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे तर जामखेड तालुक्यातील अरणगाव, पारेवाडी, बऱ्हाणपूर, पाढंरेवाडी-गीतेवाडी. आणि दिघोळ- रंधवे वस्तीवर पाणीपुरवठा सुरु आहे.. पाण्याची सोय केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येतं आहे.
चौकट
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार" पक्षाचे सर्व पदाधिकारी लोकांच्या संपर्कात असल्याने आपल्याला ही सेवा देता येत आहे. पावसाळा आणखी दूर असल्याने येणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी आत्ताच सज्ज व्हायला हवे तसेच पाण्यासाठी राजकारण न करता सामान्य नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे."
रोहित पवार
(आमदार कर्जत- जामखेड )
No comments:
Post a Comment