पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१३ मार्च
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनच्या हददीतील जवळके या गावातून माणूसकीला काळे फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली असून त्यानुसार गावातील एका आरोपीने १३ वर्ष ७ महिने वयाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला असून या घटनेमुळे संपुर्ण जामखेड तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
याबाबत सविस्तर असे की, दि-८ जानेवारी ते दि १० मार्च रोजीचे रात्री १० :३० वाजे पर्यंत जामखेड तालुक्यातील नान्नज व जवळके येथील फिर्यदीचे घराच्या पाठीमागे शेताच्या बांधावर यातील फिर्यादी अल्पवयीन पीडित मुलगी वय १३ वर्षे ७ महिने १५ दिवस हिला आरोपी ऋषी पिमराव वाळुंजकर रा. जवळके याने वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या राहते घराच्या मागे व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बळजबरी करून तिचे बरोबर शारीरिक संबंध केले आहेत. त्यानुसार अल्पवयीन पिडीत हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ऋषी पिमराव वाळुंजकर रा. जवळके ता.जामखेड याचे विरुध्द गु. रजि.नं व कलम I53/2024 भा.द.वी.क.376(2)(n),506 तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड हे करत असून गुन्ह्यातील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आजही मुली सुरक्षित नसल्याचे समोर येत असून सदर आरोपीस लवकरात लवकर अटक करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment