पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२७ एप्रिल
निमगाव डाकू ता. कर्जत येथे कार्यरत असलेले तत्कालीन पोस्टमास्तर धनराज राजे भोसले यांनी पोस्टाचा अपघाती विमा उतरवलेल्या व पिंपरखेड येथील रहिवाशी असलेले अरुण शंकर ढवळे यांचा बजाज चा अपघाती विम्याचा दावा नुकताच मंजूर झाला.
त्यांचा अपघाती विमा निमगाव डाकू पोस्ट ऑफिस येथे उतरवला होता परंतु दुर्दैवाने एक महिन्यातच त्याचा अपघात झाला होता. व हाताला दुखापत झाली होती. त्यांनी हॉस्पिटल ला उपचार घेतल्यानंतर अपघाती विमा दावा केला होता. व त्यांचा ४५,८५५ रुपयांचा दावा नुकताच मंजूर झाला
सदर दाव्याचा धनादेश वितरण समारंभ नुकताच जामखेड टपाल कार्यालय येथे पार पडला.
हा धनादेश वाटप अहमदनगर पोस्ट बँकेचे अमोल भूमकर, कर्जत डाक उपविभागाचे प्रमुख अमित देशमुख, बजाज विमा कंपनीचे योगेश साळवे आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी पोस्टमास्तर अविनाश ओतारी, बळी जायभाय, मोहन पंडित, सुनील धस, छगन ढवळे, लक्ष्मण बर्डे, सुनील हंबीरराव, लालासाहेब पवार आदी उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश जगताप यांनी केले आभार सूर्यकांत शिंदे यांनी मानले. सदर विमा मंजुरीसाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल धनराज राजे भोसले यांचा ही सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment