दिनांक 26 जामखेड तालुक्यातील हळगाव येथे जामखेडचे तालुका कृषी अधिकारी व त्यांची टीम शेतकऱ्यांच्या बांधावर. याबाबत सविस्तर असे की खरीप हंगामात उडीद, तूर, सोयाबीन इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात हळगाव, जवळा, नान्नज पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. सध्या तूर पिकावर वांझ रोग व उडीद, सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव असल्याने जामखेडचे तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब वाघमारे ,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक तुषार गोलेकर, हळगाव येथील शेतकऱ्यांना वांझ रोग व अळीचा प्रादुर्भाव या रोगापासून तुर, उडीद, सोयाबीन पिकांचे रोगांपासून बचाव करण्यासाठी, मार्गदर्शन केले. तुर पिकावरील वांझ रोग हटवण्यासाठी शेतकऱ्यांनी रोगग्रस्त तूर उपटून जाळून टाकावे किंवा मातीत पुरावे असे न केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानी सामोरे जावे लागेल. म्हणून वेळीच शेतकऱ्यांनी शिफारनुसार उडीद सोयाबीन पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करावी असे मार्गदर्शन केले. यावेळी हळगाव सेवा सोसायटीचे चेअरमन किसनराव ढवळे, लिंबू उत्पादक कंपनी कर्जत /जामखेड चे व्हॉ. चेअरमन शरद ढवळे, बापूराव ढवळे, शिवाजी ढवळे, अशोक ढवळे, सुरेश ढवळे सह शेतकरी उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याने हळगाव येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (संक्षिप्त साठी) तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर जामखेड / जामखेड तालुक्यात तूर, उडीद, सोयाबीन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात आहे. वांझ रोग व आळीचा प्रादुर्भाव तूर , सोयाबीन, उडीद इत्यादी पिकावर असल्याने .वांझ रोग व अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असे राजेंद्र सुपेकर यांनी सांगितले.
शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२
Home
हळगाव
तूर, उडीद, सोयाबीन वांझ रोग व अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी अधिकारी यांनी हळगाव येथे केली पाहणी
तूर, उडीद, सोयाबीन वांझ रोग व अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी अधिकारी यांनी हळगाव येथे केली पाहणी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड
संपादिका-सा.पोलीस वारंट
मो नंबर-९९७०५२९६९७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा