पोलीसांना व्यक्तीगत घर बांधण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी कर्जत जामखेड मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे.
रस्ते, पाणी, वीज आदी मुलभूत प्रश्नांबरोबरच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी आ. रोहित पवार यांचा नेहमीच अग्रह असतो. त्यानुसार त्यांनी जामखेड तालुक्यात पंचायत समिती, पोलीस अधिकारी कर्मचारी निवासस्थान यांच्यासाठी भव्य निवासस्थान मंजूर करून घेतली. यापैकी पोलीस वसाहतीचे काम अंतीम टप्प्यात आहे. ही निवासस्थाने कर्तव्यावर असताना व जिथे बदली होईल तिथे मिळतील. मात्र स्वतःच्या गावावर किंवा सोयीच्या ठिकाणी स्वतःचे घर निर्माण करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्या आवश्यक तेव्हढा निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांना अपेक्षे प्रमाणे घर बांधता येत नाही.
याचाच विचार आ. रोहित पवार यांनी सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात स्वतःचे घर बांधण्यासाठी २५ लाख रुपयांपर्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा